Friday 12 August 2016

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."- क्रांतिवीर संगोळी रायन्ना

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."

थोर राष्ट्रभक्त व क्रांतिकारक संगोळी रायन्नांना फाशी देण्यापुर्वी त्यांनी प्रकट केलेली ही अंतिम इच्छा...

१५ ऑगस्ट रोजी या क्रांतिकारक याची जयंती आणि २६ जानेवारी रोजी स्मृतिदिन असतो हाही एक विलक्षण योगायोग आहे आणि तो केवळ संगोळी रायन्नां यांचे वाट्याला यावा हे विशेष आहे. इतिहासाच्या पानात अनेक थोर क्रांतीकारक दाबले गेले आहेत. यामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषबाबू, बाबूगेणू आदी बोटावर मोजण्याइतपत काही मोजक्या क्रांतिकारक महावीरांची नावे वगळली तर आजवर आपणास देशाकरिता व स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राणाहुती देणाऱ्या अनेक महावीरांची नावे सुध्दा माहित झाली नाहीत याची खंत वाटते.

माहित आहेत त्याव्यतिरिक्त अनेक क्रांतिवीर होऊन गेले आहेत. यामध्ये सम्राट महाराजा यशवंतराव होळकर, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, झलकारीबाई , बाबू गडारी अशा पुष्कळ अज्ञात महावीरांची नावे व त्यांचा इतिहास आपणापासून कोसो दूर आहे...

आजपर्यंत जे महापूरूष उपेक्षीत राहीले त्यामध्ये क्रांतीवीर संगोळी रायन्नांचा फार वरचा क्रमांक लागतो. आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा " जयंती" तसेच "प्रजासत्तादिन हा स्मृतीदिन" असणारा जगातील एकमेव भाग्यवान क्रांतीकारक म्हणजेच रायान्ना. म्हणूनच १५ आँगस्ट हि भारताच्या स्वातंत्र्यदिना सोबतच क्रांतीवीर रायन्नांची जयंती सुध्दा आहे.

@ संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारक कार्य @

१५ ऑगस्ट १७९८" रोजी कर्नाटकातील एका गरिब धनगर कुटूंबात रायन्नांचा "जन्म" झाला. ते लहानपणा पासूनच साहसी व काटक वृत्तीचे होते या गुणांचा फायदा त्यांना इंग्रजांविरुद्ध लढताणा झाला...
ब्रिटीश सरकारने कित्तूर म्हणजेच कर्नाटकची राणी चेन्नम्मा हिचे दत्तक वारसा नामंजूर करून तिचे संस्थान खालसा केले. त्यामुळे स्वाभिमानी राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध युध्द पुकारले. त्यावेळी चेन्नम्माचा सेनापती या नात्याने 'रायन्ना' या युद्धाचे नेतृत्व करत होते. स्वतः राणी सुध्दा घोड्यावर स्वार होवून इंग्रजाविरूध्द लढाईत सहभागी झाली होती. तुंबळ युध्द झाले रायन्नांनी पराक्रमाची शर्थ केली परंतू दुर्दैवाने चेन्नम्मास कैद केले गेले त्यातच तिचा मृत्यू झाला त्यामुळे रायन्नास पराभवास तोंड द्यावे लागले.
त्यानंतर पराभवाने खचून न जाता रायन्नांनी कष्टकरी, गोरगरीब व सामान्य जनतेतून पुन्हा सैन्य उभे केले अन् चांगले हात धुवून इंग्रज सरकारच्या मागे लागले. त्यांनी गणिमी काव्याने हल्ले करून इंग्रज सरकारवर चांगली जरब बसवली. सरकारी मालमत्तेवर हल्ले करणे, ब्रिटीशांचा खजिना लुटून गोरगरिबांना वाटणे, इंग्रज सरकारच्या बळावर गरिब जनतेला छळणाऱ्या सावकारांना झोडपून त्यांच्या ताब्यातील गरिब जनतेच्या जमिनी सोडवणे आदी कामे करून रायन्नांनी सामान्य जनतेस स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यास प्रोत्साहित केले..
रायन्नांनी अविरत सहा वर्ष झुंज देवून ब्रिटिश राजवटीस सळो कि पळो करून सोडले.

यन्नांनी ब्रिटीश राजवटीविरोधात पुकारलेल्या बंडास जनतेचा उदंड पाठींबा मिळाला त्यांची ही चळवळ कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व आंधप्रदेशातही पसरू लागल्याने भारतील ब्रिटीशांचे सरकारचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. ब्रिटीशांनी रायन्नांची चांगलीच धास्ती घेतली. ब्रिटीश सरकारला आपले राज्य टिकवण्यासाठी ऐन केन प्रकारे रायन्नांना जेरबंद करणे अगत्याचे झाले. म्हणून त्यांनी रायन्नास पकडून देणाऱ्या करिता मोठे बक्षिस जाहिर केले..
अखेर फितुरीने घात केला. पैश्याच्या अमिषाला बळी पडणाऱ्यांनी रायन्नांचा घात केला.भारताच्या स्वातंत्र्याकरिता झगडणारा एक वाघ फितूरीने कैद केला गेला. "२६ जानेवारी १८३१" रोजी बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील नंदगड या गावी एका वडाच्या झाडाला रायन्नांना 'फाशी' दिली. ते वडाचे झाड आजही आहे त्याखालीच रायन्नांची लहानशी समाधी देखील आहे.

"संगोळी रायन्ना सारखा शुरवीर पुत्र आमच्या पोटी जन्मास यावा" असे नवस बोलून अनेक नववधू आजही त्या वडाच्या झाडास एक लहान पाळणा बांधतात. रायन्ना फाशी गेले पण जाता जाता असंख्य क्रांतीच्या मशाली पेटवून गेले. रायन्नांच्या जिवनावर एक कन्नड चित्रपटही आहे तसेच गेल्या वर्षी बंगळुरू येथील मोठ्या रेल्वे स्थानकाला संगोळी रायन्नांचे नावही दिले आहे.
(सौजन्य शैलेश काळे)

@ १५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. हा मेसेज जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहचवावा @

@ पुण्यात देखील आपण १५ ऑगस्ट २०१६ रोजी संगोळी रायन्ना यांचे जयंती निमित्य अभिवादन करणार आहोत. तरी सर्वांनी सकाळी १०.०० वाजता विश्वरत्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, सारसबाग येथे उपस्थित राहावे.@

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment