Friday 12 August 2016

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."- क्रांतिवीर संगोळी रायन्ना

" या भूमीवर पुन्हा एकदा जन्म घेवून ब्रिटीशांना या देशातून हाकलून लावणे, हीच माझी अंतिम इच्छा आहे."

थोर राष्ट्रभक्त व क्रांतिकारक संगोळी रायन्नांना फाशी देण्यापुर्वी त्यांनी प्रकट केलेली ही अंतिम इच्छा...

१५ ऑगस्ट रोजी या क्रांतिकारक याची जयंती आणि २६ जानेवारी रोजी स्मृतिदिन असतो हाही एक विलक्षण योगायोग आहे आणि तो केवळ संगोळी रायन्नां यांचे वाट्याला यावा हे विशेष आहे. इतिहासाच्या पानात अनेक थोर क्रांतीकारक दाबले गेले आहेत. यामध्ये भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाषबाबू, बाबूगेणू आदी बोटावर मोजण्याइतपत काही मोजक्या क्रांतिकारक महावीरांची नावे वगळली तर आजवर आपणास देशाकरिता व स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राणाहुती देणाऱ्या अनेक महावीरांची नावे सुध्दा माहित झाली नाहीत याची खंत वाटते.

माहित आहेत त्याव्यतिरिक्त अनेक क्रांतिवीर होऊन गेले आहेत. यामध्ये सम्राट महाराजा यशवंतराव होळकर, उमाजी नाईक, संगोळी रायन्ना, बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, झलकारीबाई , बाबू गडारी अशा पुष्कळ अज्ञात महावीरांची नावे व त्यांचा इतिहास आपणापासून कोसो दूर आहे...

आजपर्यंत जे महापूरूष उपेक्षीत राहीले त्यामध्ये क्रांतीवीर संगोळी रायन्नांचा फार वरचा क्रमांक लागतो. आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिन हा " जयंती" तसेच "प्रजासत्तादिन हा स्मृतीदिन" असणारा जगातील एकमेव भाग्यवान क्रांतीकारक म्हणजेच रायान्ना. म्हणूनच १५ आँगस्ट हि भारताच्या स्वातंत्र्यदिना सोबतच क्रांतीवीर रायन्नांची जयंती सुध्दा आहे.

@ संगोळी रायन्ना यांचे क्रांतिकारक कार्य @

१५ ऑगस्ट १७९८" रोजी कर्नाटकातील एका गरिब धनगर कुटूंबात रायन्नांचा "जन्म" झाला. ते लहानपणा पासूनच साहसी व काटक वृत्तीचे होते या गुणांचा फायदा त्यांना इंग्रजांविरुद्ध लढताणा झाला...
ब्रिटीश सरकारने कित्तूर म्हणजेच कर्नाटकची राणी चेन्नम्मा हिचे दत्तक वारसा नामंजूर करून तिचे संस्थान खालसा केले. त्यामुळे स्वाभिमानी राणी चेन्नम्माने ब्रिटीशांविरुद्ध युध्द पुकारले. त्यावेळी चेन्नम्माचा सेनापती या नात्याने 'रायन्ना' या युद्धाचे नेतृत्व करत होते. स्वतः राणी सुध्दा घोड्यावर स्वार होवून इंग्रजाविरूध्द लढाईत सहभागी झाली होती. तुंबळ युध्द झाले रायन्नांनी पराक्रमाची शर्थ केली परंतू दुर्दैवाने चेन्नम्मास कैद केले गेले त्यातच तिचा मृत्यू झाला त्यामुळे रायन्नास पराभवास तोंड द्यावे लागले.
त्यानंतर पराभवाने खचून न जाता रायन्नांनी कष्टकरी, गोरगरीब व सामान्य जनतेतून पुन्हा सैन्य उभे केले अन् चांगले हात धुवून इंग्रज सरकारच्या मागे लागले. त्यांनी गणिमी काव्याने हल्ले करून इंग्रज सरकारवर चांगली जरब बसवली. सरकारी मालमत्तेवर हल्ले करणे, ब्रिटीशांचा खजिना लुटून गोरगरिबांना वाटणे, इंग्रज सरकारच्या बळावर गरिब जनतेला छळणाऱ्या सावकारांना झोडपून त्यांच्या ताब्यातील गरिब जनतेच्या जमिनी सोडवणे आदी कामे करून रायन्नांनी सामान्य जनतेस स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यास प्रोत्साहित केले..
रायन्नांनी अविरत सहा वर्ष झुंज देवून ब्रिटिश राजवटीस सळो कि पळो करून सोडले.

यन्नांनी ब्रिटीश राजवटीविरोधात पुकारलेल्या बंडास जनतेचा उदंड पाठींबा मिळाला त्यांची ही चळवळ कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा व आंधप्रदेशातही पसरू लागल्याने भारतील ब्रिटीशांचे सरकारचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली. ब्रिटीशांनी रायन्नांची चांगलीच धास्ती घेतली. ब्रिटीश सरकारला आपले राज्य टिकवण्यासाठी ऐन केन प्रकारे रायन्नांना जेरबंद करणे अगत्याचे झाले. म्हणून त्यांनी रायन्नास पकडून देणाऱ्या करिता मोठे बक्षिस जाहिर केले..
अखेर फितुरीने घात केला. पैश्याच्या अमिषाला बळी पडणाऱ्यांनी रायन्नांचा घात केला.भारताच्या स्वातंत्र्याकरिता झगडणारा एक वाघ फितूरीने कैद केला गेला. "२६ जानेवारी १८३१" रोजी बेळगाव जिल्ह्यातील, खानापूर तालुक्यातील नंदगड या गावी एका वडाच्या झाडाला रायन्नांना 'फाशी' दिली. ते वडाचे झाड आजही आहे त्याखालीच रायन्नांची लहानशी समाधी देखील आहे.

"संगोळी रायन्ना सारखा शुरवीर पुत्र आमच्या पोटी जन्मास यावा" असे नवस बोलून अनेक नववधू आजही त्या वडाच्या झाडास एक लहान पाळणा बांधतात. रायन्ना फाशी गेले पण जाता जाता असंख्य क्रांतीच्या मशाली पेटवून गेले. रायन्नांच्या जिवनावर एक कन्नड चित्रपटही आहे तसेच गेल्या वर्षी बंगळुरू येथील मोठ्या रेल्वे स्थानकाला संगोळी रायन्नांचे नावही दिले आहे.
(सौजन्य शैलेश काळे)

@ १५ ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे. हा मेसेज जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहचवावा @

@ पुण्यात देखील आपण १५ ऑगस्ट २०१६ रोजी संगोळी रायन्ना यांचे जयंती निमित्य अभिवादन करणार आहोत. तरी सर्वांनी सकाळी १०.०० वाजता विश्वरत्न पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक, सारसबाग येथे उपस्थित राहावे.@

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

महाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??

हाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??
महारष्ट्रात दुग्ध क्रांती झाली ती सहकारी दुग्ध संस्था उभ्या राहिल्या म्हणून. सहकार क्रांतीमुळे दुध क्रांती निर्माण झाली असेही म्हणता येईल. या राज्यात कृषि व्यवसायाला पूरक असा डेअरी व्यवसाय असल्याने तसेच दुध देणारे पशुधन शेतीला शेनखत देण्यास उपयुक्त असल्याने खरे तर चालना मिळाली. हे घडण्यास जसे दूरदृष्टी असणारे नेतृत्व कारणीभूत होते तसेच या राज्यातील प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी आणि दुध उत्पादक महत्वाचा होता. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात दुग्ध उत्पादन होऊ लागल्याने सर्व सामान्य कष्टकरी, कामगार आणि गरीब माणूस सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि मुला बाळांना दुध देऊ लागला होता. देशात दुध उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या राज्याच्या पंक्तीत महाराष्ट्र जाऊन बसला तो सर्वांच्या कष्टाने आणि मेहनतीने तसेच या राज्यात दूरदृष्टी असणाऱ्या व निस्वार्थी नेतृत्वामुळे.
मात्र काळ बदलला तसे नेतृत्व बदलत गेले. सहकार उभा करणाऱ्या पिढीचे नेतृत्व बाजूला झाल्यावर आणि त्यांचे पुढचे पिडीचे शिलेदार राजकारणात आले ज्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्तुत्व, त्याग आणि निस्वार्थी भावना या सर्व बाबींना फाटा देऊन सहकार क्षेत्राची पुरती वाट लाऊन टाकल्याचे सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. राज्यात सर्व विभागात मिळून एकूण २७४६२ सहकारी दुध संस्था होत्या. मात्र स्वार्थी राजकारणी यांची वक्रदृष्टी यावर पडली आणि स्वताचे दुध संघ, डेअरी काढून सहकारी संस्थाना खड्यात घातले गेले. आज कागदोपत्री फक्त ११५९४ संस्था जिवंत आहेत. तसेच ७४४१ संस्था बंद असून अवसायानात निघालेल्या संस्थांची यादी आहे ८४२७. जर आपण या संस्था यांचे ऑडीट केले स्थापनेपासून तर एक समान धागा दिसेल कि आज ज्यांचेकडे खाजगी डेअरी आहेत त्यापैकी अनेकजन या सहकारी संस्थामान्ध्ये संचालक, चेअरमन आणि विविध पदावर काम करत होते असे दिसेल.
सहकरी डेअरी सामान्य शेतकरी आणि दुध उत्पादकाला त्याचे कुटुंब उत्तम चालावे यासाठी फार उपयुक्त होत्या. मात्र जाणीवपूर्वक आपल्या खाजगी संस्था मोठ्या व्हावेत याचा विचार करून या सहकारी संस्था बुडवल्या किंवा अवसायानात काढल्या असे अनेक लोक बोलत आहेत. विभागीय, जिल्हा आणि तालुका सहकरी संघ होते त्याचीसुद्धा अशीच वाट लावली आहे. तसेच राज्यात दुग्ध विकास व्हावा यासाठी विविध अनुदान दिली गेली आणि योजना राबवल्या गेल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील योजना आहेत :
१. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गतइंटिग्रेटेड डेरी फार्म प्रकल्पासाठी निवडलेल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांची यादी
२. स्वच्छ दूध उत्पादन योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत मंजूर निधी आणि राज्य सरकार मार्फत वितरीत झालेला निधी
३. रा.कृ.वि.यो. अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची माहिती
४. वेगवर्धक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी दुध संघाची यादी
या योजना राबवल्या गेल्या आहेत. हि फक्त प्रातिनिधिक स्वरूपातील नावे आहेत. आता या योजनाचे लाभार्थी कोण आहेत हा खरा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर जे हुशार आहेत त्यांना नक्कीच सापडेल. ज्यांनी सहकाराची आणि सहकारी दुध संस्था यांना मोडून आपल्या खाजगी संस्था उभ्या केलेले नतदृष्ट राजकारणी तर नाहीत ना ? राजकीय टाकत आणि मिळवलेली पदे यांचा दूरउपयोग करून सरकारी निधीतून आपल्या खाजगी संस्था कश्या मोठ्या केल्या तसेच सहकारी संस्था नेमक्या कोणी आणि का बुडवल्या त्याचे उत्तर नक्कीच आपल्याला सापडेल. स्वार्थी आणि संधी साधू लोकांनी या संस्थाना अक्षरशा समुद्रात बुडवले असे म्हणता येईल. सामान्य लोकांना भावनिक करून राजकारण करणाऱ्यांचे पितळ मात्र उघडे पडले नाही किंवा सामान्य जनतेला सुद्धा आपला घात कसा आणि कोणी केला हे समजलेच नाही. मात्र आता दुध संस्था, सहकारी बँका आणि साखर कारखाने कोणी बुडवून खाल्ले हेही समोर आलेले आहे. त्यामुळे आता अश्या दृष्ट लोकांना लोकांनी घरी पाठवले तरच अजून जिवंत असलेल्या संस्था वाचतील अन्यथा उरलेल्या सुद्धा पाण्यात जातील....
( वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत असेल)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Monday 8 August 2016

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....

स्वयंम घोषित गोरक्षक हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत....
सरकार ने गो हत्या बंदी आणली आणि त्याची अंमलबजावणी सुरु झाली. त्याचबरोबर गोरक्षक नावाची एक पिल्लावळ जन्माला आली. देशात आणि राज्यात गोरक्षक यांनी केलेले अत्याचार मग ती दलित यांना, मुस्लीम यांना केलेली मारहाण असो किंवा कोणाला मारले असेल अश्या घटना सगळीकडे वाढत असल्याचे दिसून आल्या. अनेक शेतकरी त्यांचेकडे भाकड झालेल्या किंवा वय झालेल्या किंवा दुष्काळामुळे स्वतःला जगणे मुश्कील झाले आहे ते आपली जनावरे विकत होते त्यांना सुद्धा त्रास झाला कारण कोणी गाई विकत घ्यायला तयार नाही. तसेच ज्यांचा गाई च्या कतली करून त्याचे मांस विक्री करणे हा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांचे व्यवसायावर गंडांतर आले. म्हणजे एक भयंकर समस्या अनेक लोकांच्या पुढे उभी राहिली ती अनेकांचे पोट भरण्याचे साधन हिरावून घेतले गेले तर अनेकांना आपल्या गाई विकता येत नव्हत्या.
अनेक ठिकाणी गाई विकायला घेऊन जाणार्या शेतकरी, चालक किंवा ज्याला विकायला घेऊन जात आहेत त्यांना प्रचंड मारहाण किंवा अनेक ठिकाणी मारहाणीत मृत्यू झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हा हल्लाबोल चालू होता त्यावेळी कोणाचे त्या प्रश्नाकडे लक्ष जात नव्हते. खुद्द प्रधानमंत्री सुद्धा या घटनांकडे लक्ष देत नव्हते. मात्र परवा त्यांनी वक्तव्य केले कि मला गोळ्या घाला पण दलित लोकांना मारू नका याबद्दल त्यांचे आभार जर त्यांचे म्हणणे खरे आणि आपल्या अन्त्कारनातून आले असेल तर नक्कीच आभार. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब या राज्यात गोरक्षक फारच आक्रमक होत होते आणि त्या राज्यात घटना जास्त वाढत होत्या. प्रधानमंत्री म्हणाले त्याप्रमाणे ८०% गोरक्षक हे बोगस होते याचा नुकताच खुलासा झाला आहे. यामध्ये गोरक्षक नावाने गुंड लोक त्या गाड्या कडून हप्ते गोळा करायचे. त्या लोकांनी गुंड पाळले होते जे यांचेकडून पैसे वसूल करत होते. एका जनावरामागे २०० ते ३०० रुपये किंवा एका ट्रक मागे २०००० रुपये पर्यंत उकळत असत.
गोरक्षक नावाने वावरणारे मानवभक्षक नेमके काय करत होते ??? तर ते पैसे वसूल करत होते. मग गाई किंवा जनावरे भरून जाणारे ट्रक यांना कसा माहित असायचा हे माहित झाले तेंव्हा तर हे गोरक्षक नसून मानवभक्षक आहेत हे नक्कीच झाले. जे गाई विकायचे ते हे गोरक्षक होते मग गाई विकल्या कि त्यांचे पाळलेल्या गुंडाकडून त्या ट्रकला आडवायला सांगून त्याकडून पैसे वसूल करत असत. जे देत नव्हते त्यांना मारहाण केली जायची तसेच या गोरख धंद्याला कवच म्हणून त्यांनी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद याचे कवच घातले होते. आपल्या गोरक्ष धंद्या साठी दलित, हिंदू आणि मुस्लीम अशी उभी फुट पाडणारे हे धर्म मार्तंड आपल्या धंद्यासाठी आपण काय करत आहोत याचा विचार सुधा करत नाहीत. धर्मवेडे किंवा धर्मंद असणे त्या त्या देशासाठी किती धोकादायक असते ते पाकीस्थान , सिरीया यावरून दिसून येते. गोरक्षक हे ना धर्म प्रेमी आहेत किंवा गोवंश रक्षण करायचे आहे. त्यांना त्याचे आडून आपला धंदा वाढवायचा असल्याचे दिसते. खरच हे गोरक्षक होते तर त्यांनी मग शेतकरी आणि गरीब मजूर यांचेकडे भाकड झालेल्या गाई यांना स्वतः सांभाळायला हवे होते किंवा त्या गाई स्वतःकडे ठेऊन त्यांची चारा आणि पाणी याची व्यवस्था करायची होती, पण तसे होताना दिसत नाही. वस्तुतः कोणताही शेतकरी किंवा ज्याचेकडे गाई किंवा कोणतेही जनावर असेल तर ते खाटिक किंवा कोणाला विकायला मनावर फार मोठा दगड ठेऊन ते विकावे लागते कारण ते जनावर त्यांचे कुटुंबाचा एक भाग असते. पण स्वतः जगणे मुश्कील झालेला शेतकरी मग इलाज नसतो त्यावेळी पशुधन विकून टाकतो. मात्र अश्या बोगस गोरक्षक यामुळे शेतकरी, कामगार तसेच त्यावर ज्यांची पोटे चालत होती त्यांचे जगणे मुश्कील करून टाकले.
त्यामुळे आजूबाजूला अशे किती संधिसाधू आणि बोगस गोरक्षक आहेत हे तपासून पाहिले पाहिजे. तसेच त्यांना आता रोखले पाहिजे ते म्हणजे सर्व समाज व्यवस्थेने अन्यथा या देशात अशांतता माजल्या शिवाय राहणार नाही. तसेच जातीय, धार्मिक तेढ वाढवून हे महाभाग आपला धंदा अजून तेजीत आणतील. प्रधामंत्री यांचे म्हणणे त्यांनी आणि देशातील प्रत्येक राज्यातील सरकार यांनी अश्या भोंदू आणि बोगस गोरक्षक यांनी वेळीच रोखावे जेणेकरून देश जो भलत्याच दिशेला घेऊन जाणारे आणि मानवभक्षक असणारे उद्या देशात काय काय करून ठेवतील याची कल्पना देखील करता येत नाही. ( आज तक वर याचे स्टिंग झाले असून बोगस गोरक्षक यांची पोल खोल झाली आहे)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१