Monday 22 February 2016

दुष्काळामुळे सामाजिक जीवन उद्वस्त होत चालले आहे याकडे कोण लक्ष देणार का ??

बीड मध्ये २५ युवती यांनी घेतला लग्न न करण्याचा निर्णय :

दुष्काळामुळे सामाजिक जीवनच उध्वस्त होत चालले असल्याचे बीड मध्ये दिसून आले आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आणि उग्र झाला आहे. याच जिल्ह्यात ३०१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत जे कि नक्कीच भूषण नाही. जिल्ह्यातील पाचोळा आणि माजलगाव भागातील अनेक तांड्यावर भीषण पाणीटंचाई आहे त्यामुळे मेंढपाळ, पशुपालक यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.

हि सगळी भयावह परिस्थिती पाहून तसेच अनेक मुलींच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्या आहेत तसेच कर्जाला कंटाळून जीवन संपवले आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये पाचोळा आणि माजलगाव भागातील २५ युवती लग्न करणार नाहीत अशी त्यांनी घोषणा केल्याचे वाचनात आले. तसेच त्यांनी हा निर्णय आपल्या पालकांना सुधा कळवला आहे.

दुष्काळाची धग किती भयानक आहे आणि सामाजिक जीवनात गरीब, शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, कामगार यांना याचे किती चटके बसत असतील हे संवेदनशील लोक नक्की समजून घेतील का?? सहकार्य आणि मदत करून त्यांना या भीषण दुष्काळ आणि दारिद्र्यातून सरकार तसेच इथले राज्यकर्ते बाहेर काढतील का??

चला आपण सगळे जन सामाजिक जाणीवेतून हा प्रश्न सरकार पर्यंत पोहचवू तसेच हुंडा बंदी, सामुदायिक विवाह सोहळे, दुष्काळी भागातील शिक्षण मोफत कसे करता येईल याचे पर्याय सुचवू आणि सरकार नावाची निर्जीव वास्तूला हलवून जागे करूयात.....

सरकार नेच पुढाकार घेऊन कन्यादान करावे ( सामुदायिक विवाह सोहळे तालुका, जिल्हा पातळीवर आयोजित करून गरिबांचे कल्याण करावे) तसेच सामाजिक जीवन सुरळीत करण्यासाठी निकराने प्रयत्न करावेत.तसेच राज्यातील सर्व पक्षांचे नेते, पुढारी हे सुधा असे मेळावे आणि उपक्रम घेतील का जेणेकरून लोकांना जगणे शक्य होईल????

आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहचवाल ....

Thursday 18 February 2016

शेतमाल खरेदीचे २६० कोटीचे करार संपन्न

राज्यस्तरीय शेतमाल खरेदीदार आणि विक्रेता संमेलनास जोरदार प्रतिसाद :

काल आम्ही राज्यस्तरीय खरेदीदार आणि विक्रेता संमेलन शिवाजी स्टेडीयम , बालेवाडी येथे आयोजित केले होते ज्याला उदंड प्रतिसाद लाभला.
आता खरेदीदार म्हणजे या देशात असणाऱ्या मोठ्या कंपन्या, निर्यातदार, प्रक्रियादार जे मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करतात आणि विक्रेता म्हणजे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आम्ही सर्व महाराष्ट्रात तयार केल्या आहेत. आम्ही महाराष्ट्रात ४५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण केल्या आहेत ज्या फळे, भाजीपाला, धान्य, कढधान्य, तेलबिया इत्यादी प्रकारातील शेतमाल पिकवत आहेत. एक कंपनी मध्ये ३०० ते ४०० शेतकरी ४ते५ गावातील आणि १५ ते २० गट मिळून एकत्र आलेले असतात. या कंपन्याणा आम्ही १८ लाख रुपयाचे प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मशिनरी , शेड इत्यादी साहित्य दिले आहे.
खरेदीदार कंपनी या मध्ये मोठ्या ७५ मोठ्या कंपन्या , निर्यातदार , प्रक्रियादार इत्यादी सहभागी झाले होते . मित्रानो शेतकर्यांना जेंव्हा उद्योजक , व्यावसायिक तयार करत असताना अशे मोठे खरेदीदार जे आता शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करणार आहेत.
काल झालेल्या इन्वेस्टर मिट ( खरेदीदार-विक्रेता संमेलन) या मध्ये शेतकरी आणि उत्पादक कंपन्या यांचेमध्ये २७६ करार झाले. या २७६ करारामुळे २६० कोटी रुपये चा व्यवसाय शेतकरी आणि या कंपन्या मध्ये होणार आहे. मेक इन इंडिया मध्ये जसा गुंतवणुकीचा धडाका चालू आहे तसा आम्ही इकडे बार उडवून देऊन आपल्या शेतकर्यांना आता आपला शेतमाल प्राथमिक प्रक्रिया करून विकता येणार आहे तसेच त्यांचा नफा देखील वाढणार आहे.
कालचा दिवस कृषि क्षेत्राला एक कलाटणी आणि २६० कोटी गुंतवणूक (थेट) येणार असल्याने तसेच आम्ही केलेल्या मेहनतीला फळ मिळाल्याचे खूप समाधान वाटले. आमच्या सर्व टीम चे खूप खूप आभार तसेच शेतकरी बांधवांना तसेच कृषि क्षेत्रात गुंतवणूक, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वाना शुभेच्छा तसेच ज्यांना व्यवसाय प्रस्ताव तयार करून घ्यायचे आहेत त्यांना आम्ही मोफत प्रस्ताव तयार करून देणार आहोत तसेच शेतीमध्ये, शेतमाल प्रक्रिया यामध्ये भविष्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि शेतकरी कल्याण यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत...
जय किसान .....जय भारत ....

Monday 15 February 2016

महाराष्ट्रात आपत्तीमुळे होतायत सामाजिक सुधारणा ....

महाराष्ट्रात आपत्तीमुळे होतायत सामाजिक सुधारणा :
आपल्या राज्याला अनेक समाज समाज सुधारकांचा वारसा आहे. अनेक समाज सुधारकांनी विविध रूढी आणि कालबाह्य परंपरा यावर घाव घालून त्यामध्ये बदल घडवून आणले. मात्र काही रूढी आणि परंपरा यामध्ये अनेकाने काम करून सुद्धा मोठे बदल घडवून आणणे शक्य झाले नाही. अनेकांनी आपले जीवन वेचले पण थोड्या प्रमणात बदल व्हायचे याचे कारण म्हणजे समाज मनावर असणारा परंपरा यांचा पगडा आणि ते टिकून राहावेत या साठी काम करणाऱ्या प्रतिगामी संघटना हे होते.
अलीकडे मात्र निसर्ग हाच या सामाजिक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरत आहे हे दिसून आले आहे. नैसर्गिक आपत्ती या समाजाला जश्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तसेच ते सामाजिक बदल सुद्धा घडवतात. आता
नैसर्गिक आपत्ती पैकी एक म्हणजे दुष्काळ ज्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला जात आहे. सगळीकडे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. शेती असो किंवा जनावरे असो आज कवडीमोलाने विकावी लागत आहेत याचे कारण म्हणजे शेतकरी वर्गाकडे आज सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे भांडवल नाही आणि जगण्यासाठी काही साधने नाहीत. अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्र तसेच इतर राज्यात उभी आहे.
मात्र सामाजिक जीवन आणि सामाजिक बदल मात्र घडले आहेत ते मराठवाडा आणि इतर भागात. ते बदल किंवा
असे बदलले समाजजीवन आणि सामाजिक बदल :
- एक बादली पाण्यात अंत्यसंस्कार
- दशक्रियेसाठी पाण्याची उसनवारी
- विवाहासाठी पाण्याचा खासगी टॅंकर
- जनावरांसाठी शिवारात पाणी नाही
- नात्या-गोत्याकडे जाणे थांबवले
- पैशाअभावी पै-पाहुणे थांबले
- दुष्काळात निघतोय मरिआईचा गाडा
प्रसंगी कर्ज काढून मंगल कार्यालयात झोकात विवाह करणे या भागात रुजलेली परंपरा आहे. बागायतदार मंडळी तर औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालये, हॉटेल्स आरक्षित करून हुंडा, मानपान, सत्कार, नेतेमंडळींचे संदेश असे धुमधडाक्‍यात विवाह करीत. मात्र, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद तालुक्‍याच्या ग्रामीण भागासह जालना, पैठण सबंध मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. त्याने लग्न समारंभापासून तर सबंध समाजजीवनच बदलून टाकले. रायपूर या गावात तर अंत्यसंस्कार एक बादली पाण्यात उरकले. अग्निडाग देणाऱ्याचे स्नानही त्यातच उरकले. आता सगळ्यांचीही सवय लावून घेतली आहे...
त्यामुळे निसर्ग हाच देव आहे आणि तोच मोठ्या प्रमाणवर बदल घडवून आणतो आणि तोच माणसाच्या मस्तवाल पणावर सुद्धा नियंत्रण ठेवतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तेंव्हा निसर्गाने दिलेले संसाधने यांचा जपून वापर करावा आणि जे आपले हातून कर्मकांड घडवून आणतात त्यांचा डाव ओळखला पाहिजे.

Sunday 14 February 2016

मुहूर्त पाहून बाळंतपण करणारा समाज शहाणा समाज म्हणायचा का ??

बाळंतपन सुद्धा आता मुहूर्त पाहून करतायत लोक, याला शहाणा समाज म्हणायचे का ??

मुहूर्त पाहण्याचे फ्याड किती वाढले आहे त्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या लग्न, बारसे, श्राद्ध असे अनेक विधी समाजात मुहूर्त पाहून केले जातात. पण नुकतेच एक अनोखी बाब वाचनात आली ती म्हणजे आजकाल अनेक ठिकाणी बाळंतपण सुद्धा मुहूर्त पाहून केले जात आहेत. कोणत्या तरी वैदिकाला विचारले जाते आणि त्याचेकडून बाळंतपणाचा मुहूर्त पाहिला जातो आणि त्यावेळेस सीजरीयन करून किंवा त्यावेळी पर्यंत नैसर्गिक प्रक्रिया थांबवून बाळंतपण केली जात आहेत.

नुकतीच एक बातमी वाचनात गेली कि मुहूर्त पाहून बाळंतपण करण्याच्या नादात २ महिलांचा बाळंतपणात मृत्यू झाला आहे. आता जी क्रिया नैसर्गिक आहे तिला आटापिटा करून आपल्या मनासारखे करणारा माणूस आणि नैसर्गिक क्रिया सोडून पंचांग आणि मुहूर्त याचे नादी लागून नुकसान करूनघेणारे लोक. आता या गोस्ठीला अंधश्रद्धा म्हणायची का कि दुसरे काय म्हणायचे??

आमचा सुशिक्षित समाज नक्की कोणत्या दिशेने प्रवास करत आहे?? या समाज व्यवस्थेतील मेंदूत वैदिकता , अंधश्रद्धा , आंधळेपणा किती खोलवर रुजत चालली आहे याचे हे प्रतिक आहे. शिकलेला समाज खरेच शिक्षित वाटत आहे का ??? का शिकलेला समाज मेंदूचा वापर अभ्यास स्मरण आणि मार्क्स तसेच रोजगार यासाठीच करून जसाच्या तसा इतरांकडे घहान टाकणार का तसेच आपल्या बुद्धीचा वापर करून कधी मुल्यांकन करणार आहे कि नाही. आमचे लोक अजूनही मानसिक गुलामीत जगत आहेत हे यावरून अधोरेखित होते आणि मानसिक गुलामी सगळ्यात जास्त घातक असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.

आता हि मानसिक गुलामी कमी कशी करायची आणि समाजाला प्रगतशील आणि आधुनिक करण्यासाठी या मानसिक गुलामगिरीतून बाहेर कसे काढायचे हेच मोठे आव्हाहन आधुनिक समाज सुधाराकांपुढे असणार आहे...

आपणास याबद्दल काय वाटते...आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...

Tuesday 9 February 2016

ढोंगी बाबांचे चमत्कार आणि राज्याच्या सौ. मुख्यमंत्री

ढोंगी बाबांचे चमत्कार आणि राज्याच्या सौ मुख्यमंत्री

पुण्यात परवा एका पुरस्कार वितरण सोहळ्यास सौ मुख्यमंत्री (फडणवीस) ताई उपस्थित होत्या. हा पुरस्कार सोहळा पुण्यातील एका शिक्षण संस्थेने आयोजित केला होता आणि त्यामध्ये प्रमुख अथिती सौ मुख्यमंत्री आणि स्वामी गुरुवानंद हे होते. ज्यामुळे सौ मुख्यमंत्री या महाराज यांचे दर्शनाला गेल्या त्यावेळी त्या महाराजाने हवेत हात फिरवून सोन्याचे नेकलेस काढले आणि या ताई ना दिले आणि त्यांनी तो चमत्कार पाहून ते नेकलेस स्वीकारले.

आता या महाराज (भोंदू) कसे फावते ते कळले, मोठ्या आणि प्रतिष्ठीत लोकानाच ते फक्त असे सोन्याचे नेकलेस किंवा दागिने काढून देतात मात्र गरीब लोकांना ते देत नाहीत हे दिसून आले आहे. याचे कारण लगेच कळून येते ते म्हणजे या भोंदू लोकांचे आणि राजकारणी , उद्योजक यांचे साटेलोटे हे असतेच आणि ते अनेक वेळा अधोरेखित झालेले आहे कारण २ नंबर धंदे आणि काळा पैसा सेटल करायला असे भोंदू महाराज मदत करतात. त्यामुळे यांना जादूने दागिने आणि सोने काढायला काहीच अडचण होत नाही.

पूर्वी साधू आणि संत यांचेकडे चांगले विचार सोडून आर्थिक, सांपतिक किंवा सोने, पैसा अश्या बाबी नसत किंवा त्यांना त्याचे आकर्षण पण नसे मात्र आजचे भोंदू महाराज आणि ढोंगी बाबा यांचेकडची संपती पाहिली तर डोळे दिपून जातात पण आमच्या भोळ्या जनतेच्या लक्षात येत नाही हि माया यांनी कोठून जमा केली याचा का विचार करत नाहीत. तसेच उच्चभ्रू जाणीवपूर्वक म्हणा किंवा भीतपोटी यांचेचरणी पडतात आणि आपल्य्कडील पैसा यांचे पायी अर्पण करतात.

जर एवढे सोने काढणारे आणि दागिने चमत्काराने काढणारे कारवानी महाराज असतील तर मग देशात आता सोन्याच्या खाणी बंद कराव्यात आणि या महाराजांनी देशाला सोने पुरवावे तसेच जर चमत्कार करणारे महाराज यांनी देशात खूप सोने निर्माण करून देशावरील आणि राज्यावरील कर्जाचा बोजा तरी कमी करावा ( जो आता ३.७५ लाख कोटी झाला आहे) जर असे करू शकले नाहीत तर त्यांचेवर चमत्कार दाखवून फसवणूक करणे , कर्मकांड असे गुन्हे दाखल करून सरकार ने कारवाई करावी आणि राजकारणी, प्रतिष्ठीत लोकांनी अश्या साधू आणि भोंदू पासून दूर राहावे कारण सामान्य माणूस त्यांचे अनुकरण करून यांचे चरणी आपल्या कष्टाची सगळी पूजी दान करतो भले तो उपाशी राहील पण भोळ्या आशेने सगळे अर्पण करेल. त्यामुळे सर्वांनी यापासून बोध घेऊन किमान शिकलेल्या लोकांनी अंधश्रद्धा , चमत्कार दाखवणे याला खतपाणी घालून दिशाभूल करू नाये आणि करत आहेत त्यांचेवर कायदेशीर कारवाही झाली पाहिजे.

विजय गोफणे
९४०४०८०००१

Monday 8 February 2016

आधुनिक काळातील शिवाजी महाराजांवरील आक्रमण ...

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहेत. तसेच त्या स्वराज्याची प्रेरणा आहेत. त्यांचेपासून प्रेरणा घेऊन अनेक युवक घडले आणि त्यांनी या महाराष्ट्र निर्मिती मध्ये योगदान दिले. शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि आपल्या सवंगडी मावळ्यासह ती प्रत्यक्षात उतरवली सुद्धा होती. ते एक महान आणि आदर्श राज्यकर्ते होते. पुढे त्यांचे कार्याचा वारसा हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर , बाजीराव पेशवे आणि राणोजी शिंदे यांनी समर्थपणे पेलला तसेच मराठी साम्राज्य हे संपूर्ण भारतभर वाढवले ते तलवारीच्या बळावर. प्रत्येक राज्यकर्त्याने मग शिवाजी महाराजानापासून प्रेरणा घेऊन मराठी गादी पुढे चालवली तसेच प्रजेला आपल्या पोरांप्रमाने जपले आणि त्यांची काळजी घेतली.

शिवाजी महाराजांवर मावळे जीव ओवाळून टाकत असे प्रसंगी आपला जीव देत असे कारण ते नेतृत्वगुण आणि स्वराज्य निर्मिती तसेच त्या काळातील मोघलाशाही किंवा इतर यांचे विरोधात लढा  देणे तसे कठीण होते कारण सैन्य किंवा इतर युद्ध साहित्य यामध्ये शिवाजी महाराज त्यांचेपासून कोसो दूर होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे  नातलग सुद्धा त्यांना वेढ्यात काढत होते. जे त्या मोघलांकडे चाकरी करत किंवा तिथे एखाद्या बड्या पदावर काम करत होते त्यांना शिवाजी महाराज यांचे उठाव असो किंवा स्वराज्य हि संकल्पना आणि शिवाजी महाराज हेच मुळात आवडत नसे. कारण त्यांना वाटत होते कि शिवाजी महाराज मोठे झाले तसेच  राजे झाले तर आपले स्थान धोक्यात येईल म्हणून सतत त्यांना विरोध तसेच त्यांना मागे कसे खेचता येईल यासाठी जातीचे म्हणवणारे आणि नातलग म्हणवणारे कंबर कसून असत.

शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची मुहुर्थ मेढ रोवली ती तोरणा किल्ला ताब्यात घेऊन. हा तोरणा किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्यांना मदत केली ती धनोजी धनगर यांनी. त्यांनी या किल्ल्यावर आक्रमण करण्याची योजना सांगितली तसेच महाराज्याना घोडे , गाई इत्यादी दिले तसेच स्वराज्य निर्मिती साठी आपले योगदान असावे असे सांगितले. धनोजी धनगर हे त्या किल्ल्यावर असल्यामुळे व  तो किल्ला अनेक वर्ष त्यांनी सांभाळला असल्यामुळे त्यांना  त्याची इथंभूत माहिती होती त्यामुळे किल्ला पटकन मिळवता आला आणि खर्या अर्थाने स्वराज्य निर्मितीला सुरुवात झाली मात्र स्वकीय नातेवाईक हे मात्र विरोधात होतेच.

शिवाजी महाराज यांचे प्रत्येक कार्याला आणि स्वराज्य या संकल्पनेला विरोध करणारे त्यांचे जातीचे आणि नातलग होते मात्र त्यांना साथ देणारे मावळे म्हणजे बारा बलुतेदार आणि अलुतेदार हेच होते . त्यामध्ये प्रत्येक जातीचे लोक सामावले होते. खरे तर शिवरायांच्या प्रत्येक मग कार्य असो किंवा संपती यांचे वारसदार तेच हवे होते मात्र तसे घडले नाही कारण शिवाजी महाराज एवढे मोठे कार्य करून गेल्यावर त्यांचे पश्चात त्यांचे रक्ताचे वारसदार हेच त्याचे मालक बनले. तसेच जे अगोदर मोघल दरबारी होते नंतर ते चांगभले करत तसेच शिवाजी महाराज यांचे नावाचा जयघोष करत आपली पोटे  भरू लागली.

तेच देशाच्या स्वातंत्र्यनंतर सुद्धा घडले आणि घडत आहे. मधल्या काळात आपले राजकारण टिकावे आणि घट्ट राहावे यासाठी पद्धतशीरपणे शिवाजी महाराज यांची मांडणी तसेच अभ्यासक्रमात समावेश केला तसेच त्यांचे जातीय मांडणी आक्रमकपणे करून तसेच शिवाजी महाराज यांना मराठा या जातीशी जोडून त्यांचे नावाचा खोटा जयघोष करून राजकीय कट्टरता निर्माण करण्याचे कार्य  या महाराष्ट्रात झाले. खरे तर शिवाजी महाराज यांचे  कार्य आणि शिवाजी महाराज यांचेवर कसे आक्रमण होते गेले ते दिसून येते.

त्यांचे कार्य , त्यांच्या योजना , व्यवस्थापन , नियंत्रण , कल्याणकारी संकल्पना  याचा मात्र राज्यात जास्त वापर केला नाही पण केवळ राजकारण यासाठीच शिवाजी महाराज यांचा अमर्यादित वापर होत गेला आणि शिवाजी महाराज यांचे कार्यापासून प्रेरणा घेणे दूरच राहिले उलट त्यांचे विचारांचे विरोधात हे राज्य ,राजकारण होत गेले आणि त्याचे परिणाम म्हणजे आज राज्यात शेतकरी आत्महत्या करताना तसेच बेरोजगारी , भ्रष्टाचार , महिलांवर अत्याचार , प्रचंड जातीयवाद , धार्मिक उन्माद, कायद्याचा धाक न राहणे आणि आर्थिक विषमता  इत्यादी बोकाळत गेले . एकाच जातीचे शिवाजी महाराज यांचेवर हक्क दाखवणे तसेच त्यांचेवरील आक्रमण वेळीच थोपले पाहिजे अन्यथा एक चांगला राजा फक्त एका जातीपुरता आणि राजकारणात नाव घेण्यापुरता मर्यादित राहील ज्यामुळे या राज्याचे आणि देशाचे प्रचंड नुकसान होईल. शिवाजी महाराज हि प्रत्येकाची संपती आहेत , प्रत्येकाचा आदर्श आहेत आणि प्रत्येकाचा त्यांचेवर तेवढाच हक्क आहे कारण त्यांना स्वराज्य निर्मिती करताना साथ देणारे स्वार्थी नातलग नव्हते तर आमचे बलुतेदार आणि अलुतेदार लोकच होते तसेच त्यांनी शिवाजी महाराज यांना शेवट पर्यंत साथच दिली त्यामुळे सर्वांनी शिवाजी महाराज यांचेकडे आदर्श राज्यकर्ता म्हणून पाहिले पाहिजे. तसेच इतर राजे ज्यांनी महान कार्य केले आहे त्यामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर , बाजीराव पेशवे , राणोजी शिंदे , महाराजा यशवंतराव होळकर , महाराणा प्रताप , संभाजी राजे इत्यादींना सुद्धा सर्व समाज घटकांनी आपले मानले पाहिजे आणि त्यांचे सुद्धा कार्याची आठवण काढली पाहिजे हे मुद्दाम नमूद करावेशे वाटते कारण आपण यांचे कार्य आणि यांना विसरून गेलो आहोत कारण त्यांचे उदो उदो करून राजकारण करता येत नाही म्हणून कि काय हेच समजत नाही.

जर खरच महाराष्ट्र पुरोगामी करायचा असेल तर सर्वांना स्वीकारायला शिकले पाहिजे , सर्वाना सहभागी करून घेता आले पाहिजे आणि प्रत्येक जाती समूहाला प्रतिनिधित्व , सामाजिक सहभाग तसेच सर्वाना बरोबर घेणारे राज्यकर्ते निर्माण झाले तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नक्कीच निर्माण होईल ...

Wednesday 3 February 2016

आम्ही दुसऱ्यांचे विचार फक्त शेयर करत राहणार का ??

आम्ही दुसऱ्यांचे विचार फक्त शेयर करत राहणार का ??

मला एक गोष्ठ नेहमी दिसून येते ती म्हणजे संत , स्वामी तसेच समाजातील विचारवंत यांचे विचार अनेक जन आपल्या फेसबुक ,वाटस अप किंवा इतर मेडियाद्वारे शेयर करत असतात. त्यावर त्यांना खूप लाईक सुद्धा मिळतात. शेयर केलेले विचार किंवा तत्वन्यान हे खूप चांगले असते. प्रत्यक्ष जीवनात त्याचा जर प्रत्येकाने काटेकोरपणे जर वापर केला किंवा अमलबजावणी केली तर स्वतःचे आणि इतरांचे जीवन किती तरी आनंदी आणि सुखी होऊ शकते. तसेच विचार देणाऱ्या महान विभूतींनी विचार आणि कृती केलेली असते म्हणून त्याचा फायदा त्यांचे विचार आत्मसात करणाऱ्या सर्वांना झालेला असतो.

पण काही नग मात्र ते विचार शेयर करतात आणि कृती मात्र तशी करत नाहीत. आज समाजात मोठ्या प्रमाणात असेच लोक आहेत कि जे उपदेश देतात मात्र कृती करत नाहीत. त्यांना असे वाटत असते कि सूचना किंवा कृती हि दुसऱ्याने करायची असते आणि आपण फक्त त्या विचार आणि सूचनांचे वाहक म्हणून (पोस्टमन ) म्हणून काम करणार. खरे तर समाज व्यवस्थेमधील विविध रूढी आणि परंपरा ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्यांना मुठ माती दिली पाहिजे आणि ते होण्यासाठी विचारमंथन होऊन चांगले विचार यांचा प्रचार आणि प्रसार जरूर झाला पाहिजे मात्र त्याचे जोडीला जे असे विचारांचे वाहक आहेत त्यांनी त्याला कृतीची जोड दिली तर अधिक चांगले होईल. अन्यथा असे विचार शेयर केले किंवा दुसर्याला पाठवले तरी ते केवळ नवीन व्यक्तीकडे वहन करणे एवढ्यापुरते ते मर्यादित राहते आणि पुढचा सुद्धा न वाचता ते विचार पुढे पाठवत असतो.

म्हणून विचार जरूर शेयर करावेत मात्र तसेच विचार आपण स्वतः सुद्धा आत्मसात केले आहेत किंवा नाही याची आगोदर खातरजमा करावी तसेच जे बदल अश्या विचारांनी समाजात  घडावेत असे वाटते त्यांनी ते बदल आपल्या जीवनात घडवून दाखवावेत म्हणजे कृतीशील विचार समाजात लवकर परिवर्तन घडवून आणतील.

विजय गोफणे
९४०४०८०००१