Friday 12 August 2016

महाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??

हाराष्ट्रातील दुग्ध सहकारी संस्थांची वाट लावणारे नेमके कोण ??
महारष्ट्रात दुग्ध क्रांती झाली ती सहकारी दुग्ध संस्था उभ्या राहिल्या म्हणून. सहकार क्रांतीमुळे दुध क्रांती निर्माण झाली असेही म्हणता येईल. या राज्यात कृषि व्यवसायाला पूरक असा डेअरी व्यवसाय असल्याने तसेच दुध देणारे पशुधन शेतीला शेनखत देण्यास उपयुक्त असल्याने खरे तर चालना मिळाली. हे घडण्यास जसे दूरदृष्टी असणारे नेतृत्व कारणीभूत होते तसेच या राज्यातील प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकरी आणि दुध उत्पादक महत्वाचा होता. महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात दुग्ध उत्पादन होऊ लागल्याने सर्व सामान्य कष्टकरी, कामगार आणि गरीब माणूस सुद्धा आपल्या कुटुंबाला आणि मुला बाळांना दुध देऊ लागला होता. देशात दुध उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या राज्याच्या पंक्तीत महाराष्ट्र जाऊन बसला तो सर्वांच्या कष्टाने आणि मेहनतीने तसेच या राज्यात दूरदृष्टी असणाऱ्या व निस्वार्थी नेतृत्वामुळे.
मात्र काळ बदलला तसे नेतृत्व बदलत गेले. सहकार उभा करणाऱ्या पिढीचे नेतृत्व बाजूला झाल्यावर आणि त्यांचे पुढचे पिडीचे शिलेदार राजकारणात आले ज्यांना आपल्या पूर्वजांच्या कर्तुत्व, त्याग आणि निस्वार्थी भावना या सर्व बाबींना फाटा देऊन सहकार क्षेत्राची पुरती वाट लाऊन टाकल्याचे सर्व महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. राज्यात सर्व विभागात मिळून एकूण २७४६२ सहकारी दुध संस्था होत्या. मात्र स्वार्थी राजकारणी यांची वक्रदृष्टी यावर पडली आणि स्वताचे दुध संघ, डेअरी काढून सहकारी संस्थाना खड्यात घातले गेले. आज कागदोपत्री फक्त ११५९४ संस्था जिवंत आहेत. तसेच ७४४१ संस्था बंद असून अवसायानात निघालेल्या संस्थांची यादी आहे ८४२७. जर आपण या संस्था यांचे ऑडीट केले स्थापनेपासून तर एक समान धागा दिसेल कि आज ज्यांचेकडे खाजगी डेअरी आहेत त्यापैकी अनेकजन या सहकारी संस्थामान्ध्ये संचालक, चेअरमन आणि विविध पदावर काम करत होते असे दिसेल.
सहकरी डेअरी सामान्य शेतकरी आणि दुध उत्पादकाला त्याचे कुटुंब उत्तम चालावे यासाठी फार उपयुक्त होत्या. मात्र जाणीवपूर्वक आपल्या खाजगी संस्था मोठ्या व्हावेत याचा विचार करून या सहकारी संस्था बुडवल्या किंवा अवसायानात काढल्या असे अनेक लोक बोलत आहेत. विभागीय, जिल्हा आणि तालुका सहकरी संघ होते त्याचीसुद्धा अशीच वाट लावली आहे. तसेच राज्यात दुग्ध विकास व्हावा यासाठी विविध अनुदान दिली गेली आणि योजना राबवल्या गेल्या. यामध्ये प्रामुख्याने खालील योजना आहेत :
१. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गतइंटिग्रेटेड डेरी फार्म प्रकल्पासाठी निवडलेल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांची यादी
२. स्वच्छ दूध उत्पादन योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत मंजूर निधी आणि राज्य सरकार मार्फत वितरीत झालेला निधी
३. रा.कृ.वि.यो. अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची माहिती
४. वेगवर्धक दुग्धविकास कार्यक्रमांतर्गत लाभार्थी दुध संघाची यादी
या योजना राबवल्या गेल्या आहेत. हि फक्त प्रातिनिधिक स्वरूपातील नावे आहेत. आता या योजनाचे लाभार्थी कोण आहेत हा खरा आणि महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर जे हुशार आहेत त्यांना नक्कीच सापडेल. ज्यांनी सहकाराची आणि सहकारी दुध संस्था यांना मोडून आपल्या खाजगी संस्था उभ्या केलेले नतदृष्ट राजकारणी तर नाहीत ना ? राजकीय टाकत आणि मिळवलेली पदे यांचा दूरउपयोग करून सरकारी निधीतून आपल्या खाजगी संस्था कश्या मोठ्या केल्या तसेच सहकारी संस्था नेमक्या कोणी आणि का बुडवल्या त्याचे उत्तर नक्कीच आपल्याला सापडेल. स्वार्थी आणि संधी साधू लोकांनी या संस्थाना अक्षरशा समुद्रात बुडवले असे म्हणता येईल. सामान्य लोकांना भावनिक करून राजकारण करणाऱ्यांचे पितळ मात्र उघडे पडले नाही किंवा सामान्य जनतेला सुद्धा आपला घात कसा आणि कोणी केला हे समजलेच नाही. मात्र आता दुध संस्था, सहकारी बँका आणि साखर कारखाने कोणी बुडवून खाल्ले हेही समोर आलेले आहे. त्यामुळे आता अश्या दृष्ट लोकांना लोकांनी घरी पाठवले तरच अजून जिवंत असलेल्या संस्था वाचतील अन्यथा उरलेल्या सुद्धा पाण्यात जातील....
( वाचकांच्या प्रतिक्रियांचे स्वागत असेल)
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment