Tuesday 26 April 2016

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

नागराज मंजुळे यांचा "सैराट" चित्रपट २९ एप्रिल ला प्रदर्शित होणार....

खरे तर नागराज मंजुळे हे ग्रामीण भागातील दिग्दर्शक आहेत ज्यांना चित्रपट या क्षेत्रातील कोणताही वारसा नव्हता. त्यांनी पाठीमागे जे काही चित्रपट तयार केले त्यामध्ये ग्रामीण जीवनातील अंतरंग तसेच वास्तव परखड पणे मांडले आहे. या मध्ये मग पिस्तुल्या, फैन्द्री यासारखे उत्तम चित्रपट देऊन समाज व्यवस्थेमधील ग्रामीण भागातील जातीय वास्तव तसेच मानवी मनाने केलेले प्रेम याला गावात काय मिळते हे दाखवले आहे.
नागराज ने अनेक चित्रपटातून या व्यवस्थेला जी चपराक दिलेली आहे त्यामधून या व्यवस्थेमध्ये बदल व्हावेत असी त्याची कामना आहे. नागराज चा चित्रपट असतो तो काहीतरी वेगळे घेऊन येणारा. तो स्वतः कथा लिहितो आणि त्यामध्ये वास्तव असणारे तसेच ग्रामीण जीवनात घडणारे किंवा अनुभवलेले वास्तव अधिक ठळक असते. आता येणारा सैराट सुधा नव्या दमाचा नवा सिनेमा ज्या मध्ये नेहमी प्रमाणे ज्या अभिनेता किंवा अभिनेत्री यांची कोणालाही ओळख नाही अश्या नव्या दमाच्या जोडीला जी ग्रामीण भागातील आहे ती म्हणजे ठोसर आणि रिंकू राजगुरू तसेच फैन्द्री मधील झब्या आणि डब्या आहेत या चित्रपटामध्ये ज्या मध्ये प्रेमकथा आहेच पण सामाजिक जीवनातील गावातील अनेक संघर्ष, जात आणि इतर बाबी मस्त गुंफल्या आहेत . खरे तर महेश मांजरेकर मध्ये म्हणाले होते कि मराठी चित्रपटाला मिळणारे अनुदान बंद करावे कदाचित त्यामागील हेही कारण असू शकते कि नागराज सारखे दिग्दर्शक जे ग्रामीण भागातील असून चांगले चित्रपट तयार करून त्यांना स्पर्धा करू लागलेत त्यामुळे कदाचित त्यांचे मार्ग बंद करावेत हा केविलवाणा प्रयत्न असू शकतो. पण तसे काही होईल असे वाटत नाही कारण गुणवत्ता असलेले लोक कितीही आणि काहीही केले तरी पुढे जाणार.
अजय-अतुल या जोडीचे संगीत याला लाभले असून अतिशय सुंदर आणि ठेका धरायला लावणारी गाणी आहेत. तसेच विशेष म्हणजे हॉलीवूड चे संगीत यामधील गाण्याला हॉलीवूड मध्ये जाऊन घेतले आहे. जे कि मराठी म्हणा किंवा आतापर्यंत कोणत्याही चित्रपट मध्ये झाले नव्हते. तसेच नागराज याचे विशेष अभिनंदन कि ग्रामीण भागात दडलेले कलाकार शोधून ते आणि त्यांची कला सर्वांसमोर आणत आहे तसेच कलाकार हा कोणत्याही एकाच जातीत जन्माला येत नाही तर कलेला जात नसते आणि कलाकार शहरातच जन्माला येतो त्यालाही छेद देत करमाळा जिल्हा सोलापूर भागातील कलाकार निवडून चित्रपट हा सर्वांसाठीचे मनोरंजन आणि प्रबोधन याचे मध्यम असल्याचे या चित्रपटातील संदेशाने अधोरेखित होते. तरी सर्वांनी नक्कीच आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन सैराट हा चित्रपट पहावा आणि सैराट व्हावे.....
नागराज मंजुळे यांना या चित्रपटाच्या निमित्ताने आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच आगामी काळात चांगल्या कलाकृती जन्माला घालोत याही शुभेच्छा.......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१
vijaygophaneblogspot.com
vijay.gophane@gmail.com

No comments:

Post a Comment