Friday 22 April 2016

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??

देशातील मिडीयाला अजून शहाणपण कधी येणार ??
आपला मिडिया ज्यामध्ये खासकरून काही बातम्या देणारे न्यूज चैनल अजून किती बालीशपणा करतात तेच दिसून येते. एकतर चैनल वाले तयार होऊन झालेत १२ ते वर्ष. जर मानवी वयाच्या आणि समाज याबातीत बोलायचे झाले तर अगदी लहान बाळाचे वय जसे असते तसे इथल्या न्यूज मिडियाचे वय आहे. हा बालीशपणा अनेक प्रकरणातून आणि प्रसंगातून तसेच त्यांनी दाखवलेल्या बातम्यातून दिसून येईल. या देशातील संरक्षण विषय बाबींना हात घालून सगळे उघडे करून इतर शत्रू देशांना याचा फायदा होईल याचा विचार न करता माहिती देणारा इथला मिडिया. तसेच देशात जेंव्हा मुंबई मध्ये अतेरिकी हल्ला झाला होता त्यावेळी थेट प्रक्षेपण दाखवून शत्रूला आपली रणनीती बदल करायला आणि हल्ले करायला जणू मदत करत होते के काय असा प्रश्न पडत होता.
आजही मिडिया आपल्या वागण्यात काहीच बदल करण्यास तयार नाही असे वातावरण दिसते. या देशात अनेक महत्वाच्या समस्या असताना हे पैसे घेऊन कशाला जास्त दाखवतील याचा काही नेम नाही. जर आपण नीट पाहिले तर भांडवलदारांचा हस्तक किंवा त्यांचीच पिल्लावळ असलेला हा मिडिया या देशातील वातावरण असहिष्णू करण्यास तितकाच जबादार आहे. बातमी च्या नावाखाली काहीही दाखवत असतात हे लोक. मागे राष्ट्रभक्ती यावर अनेक दिवस चर्चा घडवून आणि त्यामधून जाती आणि धर्मात वाद लावून दिले होते. तर धर्म हेतर कायम यांना वाद लावून त्याचे प्रक्षेपण करणे आणि लोकांना दुसरा कोणताही विचार करू द्यायचा नाही हे यांनी पक्के ठरवून घेतले आहे. (काही चैनल चांगले असतील पण खूप कमी आहेत)
आजच्या घडीला देशात जर पाहिले तर लोकांची मने तयार करणे किंवा त्यांचे मतपरिवर्तन करण्याचे कार्य हाच मिडिया करतो. त्यामुळे मिडिया माणसाला चालवायला लागल्याचे चित्र दिसते. यामुळे माणूस स्वतः जास्त विचार करत नाही आणि तो या मिडिया च्या भरोश्यावर विसंबून राहतो. नेमका याचाच फायदा उचलला जातो आणि दलाल निर्माण होऊन भांडवलदारांचे हित साधले जात असल्याचे दिसते. चांगले काम करणारे लोक असतील किंवा नेते असतील किंवा विषय असतील किंवा खर्या समस्या असतील इकडे हे फारसे लक्ष देत नाहीत मात्र या देशात मशीहा निर्माण किंवा जन्माला घालायचे काम हा इथला मिडिया करत आहे. लोकशाहीचा हा चौथा स्थंभ नक्की योग्य काम करतो आहे किंवा नाही याबाबत त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची नक्कीच वेळ आलेली आहे. कोणाची तरी तळी उचलून आणि त्याला प्रचंड प्रसिद्ध करायचे आणि चांगल्या लोकंकडे दुर्लक्ष्य करायचे हे एक यांचे षड्यंत्र आहे.
समाजात जागृती करून लोकशाही आणि मानवी मूल्य यांना बळकट करणे गरजेचे असताना हा मिडिया नेमके याचे उलट काम करताना दिसतो. या मिडिया इथल्या समाज व्यवस्थेमधील अनेक अश्या जमाती आहेत ज्यांच्या समस्या भयंकर आहेत तिकडे लक्ष्य द्यायला अजिबात वेळ नाही. तसेच हे लोक अंधश्रद्धा पसरवण्यास सुधा मोठ्या प्रमाणात हातभार लावतात. धार्मिक आणि दैवी गोष्टीना खतपाणी घालून लोकांचा बुद्धिभेद केला जातो तसेच लोकांना मानसिक गुलाम करायचे काम इथला मिडिया करत असतो. मिडिया काही वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसतो मात्र आता सोशल मिडिया मुळे लोकांच्या काही वेदना आणि समस्या तसेच काही वास्तव समोर येते तसेच स्वस्तात मिळणारा हा मिडिया आहे. मात्र यावर सुधा अनेक मेसेज जसे कि हा मेसेज पुढे २१ लोकांना पाठवा लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि आमचे पण भयाड लोक लगेच पाठवतात पुढे घंटा चांगली बातमी येत नाही आणिनंतर देतात नशिबाला दोष. मिडिया हा देशातील प्रत्येक घटकांचे प्रश्न मांडणारा, प्रत्येकाचा प्रतिनिधी म्हणून असला पाहिजे जो देशात विभागणी न करता उलट एकता आणि एकात्मता वाढेल तसेच सत्ताधारी पक्षावर दबाव निर्माण करेल तसेच देशात घडणाऱ्या चांगल्या आणि सकारात्मक बाबींना पुढे आणून देशाची प्रगती होईल याकडे लक्ष देईल.
अनेक मिडिया चैनल वर काही कार्यक्रम असतात त्यापैकी डिबेट हा एक कार्यक्रम असतो ज्यामध्ये विविध पक्ष आणि संघटना यामध्ये कोंबड्याची झुंज जशी लावली जाते तशी इथे लावून दिली जाते. या देशातील व्यवस्था परिवर्तन झाले पाहिजे आणि जुन्या चुकीच्या बाबी बंद झाल्या पाहिजेत यासाठी मात्र जास्त प्रमाणात हे लोक काम करत नाहीत. यांनी किमान आता तरी बालीशपण सोडून देऊन चांगले कार्य हाती घ्यावे. मिडीयाने अगोदर स्वतः काही कोड ऑफ कंडक्ट घालून घ्यावा आणि तेंव्हाच दुसर्याला नितीमुल्य शिकवावी अन्यथा दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशे म्हणावे लागेल......

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment