Thursday 18 February 2016

शेतमाल खरेदीचे २६० कोटीचे करार संपन्न

राज्यस्तरीय शेतमाल खरेदीदार आणि विक्रेता संमेलनास जोरदार प्रतिसाद :

काल आम्ही राज्यस्तरीय खरेदीदार आणि विक्रेता संमेलन शिवाजी स्टेडीयम , बालेवाडी येथे आयोजित केले होते ज्याला उदंड प्रतिसाद लाभला.
आता खरेदीदार म्हणजे या देशात असणाऱ्या मोठ्या कंपन्या, निर्यातदार, प्रक्रियादार जे मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करतात आणि विक्रेता म्हणजे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आम्ही सर्व महाराष्ट्रात तयार केल्या आहेत. आम्ही महाराष्ट्रात ४५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण केल्या आहेत ज्या फळे, भाजीपाला, धान्य, कढधान्य, तेलबिया इत्यादी प्रकारातील शेतमाल पिकवत आहेत. एक कंपनी मध्ये ३०० ते ४०० शेतकरी ४ते५ गावातील आणि १५ ते २० गट मिळून एकत्र आलेले असतात. या कंपन्याणा आम्ही १८ लाख रुपयाचे प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मशिनरी , शेड इत्यादी साहित्य दिले आहे.
खरेदीदार कंपनी या मध्ये मोठ्या ७५ मोठ्या कंपन्या , निर्यातदार , प्रक्रियादार इत्यादी सहभागी झाले होते . मित्रानो शेतकर्यांना जेंव्हा उद्योजक , व्यावसायिक तयार करत असताना अशे मोठे खरेदीदार जे आता शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करणार आहेत.
काल झालेल्या इन्वेस्टर मिट ( खरेदीदार-विक्रेता संमेलन) या मध्ये शेतकरी आणि उत्पादक कंपन्या यांचेमध्ये २७६ करार झाले. या २७६ करारामुळे २६० कोटी रुपये चा व्यवसाय शेतकरी आणि या कंपन्या मध्ये होणार आहे. मेक इन इंडिया मध्ये जसा गुंतवणुकीचा धडाका चालू आहे तसा आम्ही इकडे बार उडवून देऊन आपल्या शेतकर्यांना आता आपला शेतमाल प्राथमिक प्रक्रिया करून विकता येणार आहे तसेच त्यांचा नफा देखील वाढणार आहे.
कालचा दिवस कृषि क्षेत्राला एक कलाटणी आणि २६० कोटी गुंतवणूक (थेट) येणार असल्याने तसेच आम्ही केलेल्या मेहनतीला फळ मिळाल्याचे खूप समाधान वाटले. आमच्या सर्व टीम चे खूप खूप आभार तसेच शेतकरी बांधवांना तसेच कृषि क्षेत्रात गुंतवणूक, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वाना शुभेच्छा तसेच ज्यांना व्यवसाय प्रस्ताव तयार करून घ्यायचे आहेत त्यांना आम्ही मोफत प्रस्ताव तयार करून देणार आहोत तसेच शेतीमध्ये, शेतमाल प्रक्रिया यामध्ये भविष्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि शेतकरी कल्याण यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत...
जय किसान .....जय भारत ....

No comments:

Post a Comment