Tuesday, 9 February 2016

ढोंगी बाबांचे चमत्कार आणि राज्याच्या सौ. मुख्यमंत्री

ढोंगी बाबांचे चमत्कार आणि राज्याच्या सौ मुख्यमंत्री

पुण्यात परवा एका पुरस्कार वितरण सोहळ्यास सौ मुख्यमंत्री (फडणवीस) ताई उपस्थित होत्या. हा पुरस्कार सोहळा पुण्यातील एका शिक्षण संस्थेने आयोजित केला होता आणि त्यामध्ये प्रमुख अथिती सौ मुख्यमंत्री आणि स्वामी गुरुवानंद हे होते. ज्यामुळे सौ मुख्यमंत्री या महाराज यांचे दर्शनाला गेल्या त्यावेळी त्या महाराजाने हवेत हात फिरवून सोन्याचे नेकलेस काढले आणि या ताई ना दिले आणि त्यांनी तो चमत्कार पाहून ते नेकलेस स्वीकारले.

आता या महाराज (भोंदू) कसे फावते ते कळले, मोठ्या आणि प्रतिष्ठीत लोकानाच ते फक्त असे सोन्याचे नेकलेस किंवा दागिने काढून देतात मात्र गरीब लोकांना ते देत नाहीत हे दिसून आले आहे. याचे कारण लगेच कळून येते ते म्हणजे या भोंदू लोकांचे आणि राजकारणी , उद्योजक यांचे साटेलोटे हे असतेच आणि ते अनेक वेळा अधोरेखित झालेले आहे कारण २ नंबर धंदे आणि काळा पैसा सेटल करायला असे भोंदू महाराज मदत करतात. त्यामुळे यांना जादूने दागिने आणि सोने काढायला काहीच अडचण होत नाही.

पूर्वी साधू आणि संत यांचेकडे चांगले विचार सोडून आर्थिक, सांपतिक किंवा सोने, पैसा अश्या बाबी नसत किंवा त्यांना त्याचे आकर्षण पण नसे मात्र आजचे भोंदू महाराज आणि ढोंगी बाबा यांचेकडची संपती पाहिली तर डोळे दिपून जातात पण आमच्या भोळ्या जनतेच्या लक्षात येत नाही हि माया यांनी कोठून जमा केली याचा का विचार करत नाहीत. तसेच उच्चभ्रू जाणीवपूर्वक म्हणा किंवा भीतपोटी यांचेचरणी पडतात आणि आपल्य्कडील पैसा यांचे पायी अर्पण करतात.

जर एवढे सोने काढणारे आणि दागिने चमत्काराने काढणारे कारवानी महाराज असतील तर मग देशात आता सोन्याच्या खाणी बंद कराव्यात आणि या महाराजांनी देशाला सोने पुरवावे तसेच जर चमत्कार करणारे महाराज यांनी देशात खूप सोने निर्माण करून देशावरील आणि राज्यावरील कर्जाचा बोजा तरी कमी करावा ( जो आता ३.७५ लाख कोटी झाला आहे) जर असे करू शकले नाहीत तर त्यांचेवर चमत्कार दाखवून फसवणूक करणे , कर्मकांड असे गुन्हे दाखल करून सरकार ने कारवाई करावी आणि राजकारणी, प्रतिष्ठीत लोकांनी अश्या साधू आणि भोंदू पासून दूर राहावे कारण सामान्य माणूस त्यांचे अनुकरण करून यांचे चरणी आपल्या कष्टाची सगळी पूजी दान करतो भले तो उपाशी राहील पण भोळ्या आशेने सगळे अर्पण करेल. त्यामुळे सर्वांनी यापासून बोध घेऊन किमान शिकलेल्या लोकांनी अंधश्रद्धा , चमत्कार दाखवणे याला खतपाणी घालून दिशाभूल करू नाये आणि करत आहेत त्यांचेवर कायदेशीर कारवाही झाली पाहिजे.

विजय गोफणे
९४०४०८०००१

No comments:

Post a Comment