महाराष्ट्रात आपत्तीमुळे होतायत सामाजिक सुधारणा :
आपल्या राज्याला अनेक समाज समाज सुधारकांचा वारसा आहे. अनेक समाज सुधारकांनी विविध रूढी आणि कालबाह्य परंपरा यावर घाव घालून त्यामध्ये बदल घडवून आणले. मात्र काही रूढी आणि परंपरा यामध्ये अनेकाने काम करून सुद्धा मोठे बदल घडवून आणणे शक्य झाले नाही. अनेकांनी आपले जीवन वेचले पण थोड्या प्रमणात बदल व्हायचे याचे कारण म्हणजे समाज मनावर असणारा परंपरा यांचा पगडा आणि ते टिकून राहावेत या साठी काम करणाऱ्या प्रतिगामी संघटना हे होते.
अलीकडे मात्र निसर्ग हाच या सामाजिक बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरत आहे हे दिसून आले आहे. नैसर्गिक आपत्ती या समाजाला जश्या मोठ्या प्रमाणात नुकसान करतात तसेच ते सामाजिक बदल सुद्धा घडवतात. आता
नैसर्गिक आपत्ती पैकी एक म्हणजे दुष्काळ ज्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला जात आहे. सगळीकडे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. शेती असो किंवा जनावरे असो आज कवडीमोलाने विकावी लागत आहेत याचे कारण म्हणजे शेतकरी वर्गाकडे आज सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे भांडवल नाही आणि जगण्यासाठी काही साधने नाहीत. अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्र तसेच इतर राज्यात उभी आहे.
नैसर्गिक आपत्ती पैकी एक म्हणजे दुष्काळ ज्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला जात आहे. सगळीकडे राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. शेती असो किंवा जनावरे असो आज कवडीमोलाने विकावी लागत आहेत याचे कारण म्हणजे शेतकरी वर्गाकडे आज सलग पडणाऱ्या दुष्काळामुळे भांडवल नाही आणि जगण्यासाठी काही साधने नाहीत. अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्र तसेच इतर राज्यात उभी आहे.
मात्र सामाजिक जीवन आणि सामाजिक बदल मात्र घडले आहेत ते मराठवाडा आणि इतर भागात. ते बदल किंवा
असे बदलले समाजजीवन आणि सामाजिक बदल :
- एक बादली पाण्यात अंत्यसंस्कार
- दशक्रियेसाठी पाण्याची उसनवारी
- विवाहासाठी पाण्याचा खासगी टॅंकर
- जनावरांसाठी शिवारात पाणी नाही
- नात्या-गोत्याकडे जाणे थांबवले
- पैशाअभावी पै-पाहुणे थांबले
- दुष्काळात निघतोय मरिआईचा गाडा
- एक बादली पाण्यात अंत्यसंस्कार
- दशक्रियेसाठी पाण्याची उसनवारी
- विवाहासाठी पाण्याचा खासगी टॅंकर
- जनावरांसाठी शिवारात पाणी नाही
- नात्या-गोत्याकडे जाणे थांबवले
- पैशाअभावी पै-पाहुणे थांबले
- दुष्काळात निघतोय मरिआईचा गाडा
प्रसंगी कर्ज काढून मंगल कार्यालयात झोकात विवाह करणे या भागात रुजलेली परंपरा आहे. बागायतदार मंडळी तर औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालये, हॉटेल्स आरक्षित करून हुंडा, मानपान, सत्कार, नेतेमंडळींचे संदेश असे धुमधडाक्यात विवाह करीत. मात्र, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद तालुक्याच्या ग्रामीण भागासह जालना, पैठण सबंध मराठवाड्यात तीव्र दुष्काळ पडला आहे. त्याने लग्न समारंभापासून तर सबंध समाजजीवनच बदलून टाकले. रायपूर या गावात तर अंत्यसंस्कार एक बादली पाण्यात उरकले. अग्निडाग देणाऱ्याचे स्नानही त्यातच उरकले. आता सगळ्यांचीही सवय लावून घेतली आहे...
त्यामुळे निसर्ग हाच देव आहे आणि तोच मोठ्या प्रमाणवर बदल घडवून आणतो आणि तोच माणसाच्या मस्तवाल पणावर सुद्धा नियंत्रण ठेवतो हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. तेंव्हा निसर्गाने दिलेले संसाधने यांचा जपून वापर करावा आणि जे आपले हातून कर्मकांड घडवून आणतात त्यांचा डाव ओळखला पाहिजे.
No comments:
Post a Comment