बाळंतपन सुद्धा आता मुहूर्त पाहून करतायत लोक, याला शहाणा समाज म्हणायचे का ??
मुहूर्त पाहण्याचे फ्याड किती वाढले आहे त्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. या लग्न, बारसे, श्राद्ध असे अनेक विधी समाजात मुहूर्त पाहून केले जातात. पण नुकतेच एक अनोखी बाब वाचनात आली ती म्हणजे आजकाल अनेक ठिकाणी बाळंतपण सुद्धा मुहूर्त पाहून केले जात आहेत. कोणत्या तरी वैदिकाला विचारले जाते आणि त्याचेकडून बाळंतपणाचा मुहूर्त पाहिला जातो आणि त्यावेळेस सीजरीयन करून किंवा त्यावेळी पर्यंत नैसर्गिक प्रक्रिया थांबवून बाळंतपण केली जात आहेत.
नुकतीच एक बातमी वाचनात गेली कि मुहूर्त पाहून बाळंतपण करण्याच्या नादात २ महिलांचा बाळंतपणात मृत्यू झाला आहे. आता जी क्रिया नैसर्गिक आहे तिला आटापिटा करून आपल्या मनासारखे करणारा माणूस आणि नैसर्गिक क्रिया सोडून पंचांग आणि मुहूर्त याचे नादी लागून नुकसान करूनघेणारे लोक. आता या गोस्ठीला अंधश्रद्धा म्हणायची का कि दुसरे काय म्हणायचे??
आमचा सुशिक्षित समाज नक्की कोणत्या दिशेने प्रवास करत आहे?? या समाज व्यवस्थेतील मेंदूत वैदिकता , अंधश्रद्धा , आंधळेपणा किती खोलवर रुजत चालली आहे याचे हे प्रतिक आहे. शिकलेला समाज खरेच शिक्षित वाटत आहे का ??? का शिकलेला समाज मेंदूचा वापर अभ्यास स्मरण आणि मार्क्स तसेच रोजगार यासाठीच करून जसाच्या तसा इतरांकडे घहान टाकणार का तसेच आपल्या बुद्धीचा वापर करून कधी मुल्यांकन करणार आहे कि नाही. आमचे लोक अजूनही मानसिक गुलामीत जगत आहेत हे यावरून अधोरेखित होते आणि मानसिक गुलामी सगळ्यात जास्त घातक असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले आहेत.
आता हि मानसिक गुलामी कमी कशी करायची आणि समाजाला प्रगतशील आणि आधुनिक करण्यासाठी या मानसिक गुलामगिरीतून बाहेर कसे काढायचे हेच मोठे आव्हाहन आधुनिक समाज सुधाराकांपुढे असणार आहे...
आपणास याबद्दल काय वाटते...आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा...
No comments:
Post a Comment