आम्ही दुसऱ्यांचे विचार फक्त शेयर करत राहणार का ??
मला एक गोष्ठ नेहमी दिसून येते ती म्हणजे संत , स्वामी तसेच समाजातील विचारवंत यांचे विचार अनेक जन आपल्या फेसबुक ,वाटस अप किंवा इतर मेडियाद्वारे शेयर करत असतात. त्यावर त्यांना खूप लाईक सुद्धा मिळतात. शेयर केलेले विचार किंवा तत्वन्यान हे खूप चांगले असते. प्रत्यक्ष जीवनात त्याचा जर प्रत्येकाने काटेकोरपणे जर वापर केला किंवा अमलबजावणी केली तर स्वतःचे आणि इतरांचे जीवन किती तरी आनंदी आणि सुखी होऊ शकते. तसेच विचार देणाऱ्या महान विभूतींनी विचार आणि कृती केलेली असते म्हणून त्याचा फायदा त्यांचे विचार आत्मसात करणाऱ्या सर्वांना झालेला असतो.
पण काही नग मात्र ते विचार शेयर करतात आणि कृती मात्र तशी करत नाहीत. आज समाजात मोठ्या प्रमाणात असेच लोक आहेत कि जे उपदेश देतात मात्र कृती करत नाहीत. त्यांना असे वाटत असते कि सूचना किंवा कृती हि दुसऱ्याने करायची असते आणि आपण फक्त त्या विचार आणि सूचनांचे वाहक म्हणून (पोस्टमन ) म्हणून काम करणार. खरे तर समाज व्यवस्थेमधील विविध रूढी आणि परंपरा ज्या कालबाह्य झालेल्या आहेत त्यांना मुठ माती दिली पाहिजे आणि ते होण्यासाठी विचारमंथन होऊन चांगले विचार यांचा प्रचार आणि प्रसार जरूर झाला पाहिजे मात्र त्याचे जोडीला जे असे विचारांचे वाहक आहेत त्यांनी त्याला कृतीची जोड दिली तर अधिक चांगले होईल. अन्यथा असे विचार शेयर केले किंवा दुसर्याला पाठवले तरी ते केवळ नवीन व्यक्तीकडे वहन करणे एवढ्यापुरते ते मर्यादित राहते आणि पुढचा सुद्धा न वाचता ते विचार पुढे पाठवत असतो.
म्हणून विचार जरूर शेयर करावेत मात्र तसेच विचार आपण स्वतः सुद्धा आत्मसात केले आहेत किंवा नाही याची आगोदर खातरजमा करावी तसेच जे बदल अश्या विचारांनी समाजात घडावेत असे वाटते त्यांनी ते बदल आपल्या जीवनात घडवून दाखवावेत म्हणजे कृतीशील विचार समाजात लवकर परिवर्तन घडवून आणतील.
विजय गोफणे
९४०४०८०००१

No comments:
Post a Comment