"मेक इन इंडिया " कशाला मग "मेक इन हिंदुस्थान" का नाही ??
आज फेसबुक वर संघ समर्थक लोकांनी केलेली एक पोस्ट पाहिली. पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले होते कि अमेरिकेत राहणाऱ्या लोकांना अमेरिकी, जपान मध्ये राहणाऱ्या लोकांना जपानी, चीन मध्ये राहणारे चीनी त्या प्रमाणे हिंदुस्थान मध्ये राहणारे हिंदुस्थानी होते. व्वा काय पण फंडे आणि कसा प्रचार करतात हे लोक आणि स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवून घेतात आणि या राष्ट्राची धर्म, जाती यावरून शकले कसे करू शकतात हे लोक तेच समजत नाही.
जर हे या देशाला हिंदुस्थान म्हणत असतील तर मग ते मेक इन इंडिया कशाला राबवत आहेत त्या ऐवजी मेक इन हिंदुस्थान का राबविला नाही तसेही आता बहुमतातील आणि संघाच्या रिमोट वर चालणारे सरकार सत्तेत आहेच मग या कार्यक्रमाला सुधा मेक इन हिंदुस्थान नाव द्यायला काय हरकत होती का ??
या पवित्र भूमीचे नाव " भारत " आहे आणि कायम ते भारतच राहिले पाहिजे. याची धर्म आणि जातीच्या नावावर शकले किंवा नामांतर होता कामा नये. जर असा कोणी प्रयंत्न करेल तर तो सच्च्या देश भक्तांनी हाणून पाडला पाहिजे. या भूमीत जे लोक जन्मलेले आहेत तसेच देशाच्या विकास, जडणघडण करण्यात ज्यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्या प्रत्येक "भारतीयजनाचा" या देशावर आणि साधन संपती वर तितकाच हक्क आहे त्या प्रत्येकाची जबाबदारी आहे आपल्या या पवित्र भूमीला कोणत्याही गुलामगिरीत जाऊच द्यायचे नाही मग ती परकीय असेल किंवा स्वकीय असेल.
देशातील सच्चे देशप्रेमी मग ते कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे असोत यांनी आता संघटीत होऊन खोट्या प्रचाराच्या आधारावर या देशाचे नाव बदलवण्याचा ज्यांनी घाट घातला आहे त्यांना वेळीच आवरतील. तसेच ज्यांनी देशात भेदाभेद सुरु केला आहे अश्या धर्माच्या ठेकेदारांनी सुधा ध्यानात ठेवले पाहिजे तसेच ज्यांना देशाचा खोटा पुळका येतोय त्यांनी सुधा समजून घेतले पाहिजे कि आपल्या देशात राहणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करा आणि प्रत्येकात मध्ये देश प्रेम जागृत करा कारण बेगडी राष्ट्र प्रेम आणि धर्म प्रेमातून तुम्हाला धार्मिक आणि राजकीय सत्ता यावर कायम पकड मिळवायची आहे हे आता लपून राहिले नाही. म्हणून अश्या प्रचाराला कोणी बळी पडू नका कारण आम्हाला हिंदुस्थान नव्हे तर आम्हाला आमचा " भारत" हाच देश पाहिजे जो आम्हाला प्राण प्रिय आहेच तसेच या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीद, हुतात्मा यांनी बलिदान दिले त्यांचा खर्या अर्थाने सन्मान असेल. म्हणून संघाने या देशात विनाकारण धार्मिक वाद निर्माण करून या देशाला यादवीकडे घेऊन जाऊ नये.
इथला प्रत्येक नागरिक हा देशावर प्रेम करतो आणि देशाची प्रगती तसेच इथल्या प्रत्येक व्यक्तीचा सर्व स्तरातील विकास झाला पाहिजे तसेच प्रत्येक जन माणूस म्हणून जगाला पाहिजे यासाठी आमच्या महापुरुष ज्यांनी न्याय, बंधुता, समता, सन्मान, एकात्मता या गोष्टीवर भर दिला पाहिजे.
आम्हाला भारतीयइजम हवा आहे ना कि धर्म किंवा जाती इजम हवा आहे. तसेच देशातील प्रत्येक नागरिकामध्ये भारतीयत्व आणि भारतजन आम्हाला जागृत करायचा आहे. होय आम्हाला या देशाला महासत्ता झालेले पहायचे आहे आणि तो करण्यासाठी आम्हाला प्रयत्न सुधा करायचे आहेत. या देशाला सर्व क्षेत्रात अग्रसर करायचे आहे आणि त्यासाठी एकसंघ भावना असेल तरच सर्वांचा विकास शक्य आहे. मात्र जर धर्म आणि जाती यावरून जर वक्तव्य तसेच अजेंडे राबवणाऱ्या संघटना आक्रमक झाल्या तसेच सरकार त्यांना जर सहाय्य करणारे किंवा त्यांना पोषक वातावरण निर्माण करून देणारे असेल तर मग कशाची देशात एकता टिकेल आणि देश महासत्ता होईल मग ???
चला जागा करू प्रत्येकातला भारतीय, कायम राहू भारतीय, सन्मान वाढवू भारताचा, महासत्ता करू भारताला, ना करू दलित, मुस्लीम, बहुजन आम्ही सारे होऊ फक्त आणि फक्त भारतीयजन.....
जय भारत...
विजय गोफणे,
९४०४०८०००१
No comments:
Post a Comment