Friday, 18 March 2016

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय :

दुष्काळी स्थितीत तरुणाला तारतेय शेळीपालन, शेळीपालन एक शेतीपूरक व्यवसाय

परिस्थिती माणसाला जगणं शिकवते. नेमके ध्येय ठेवून रस्ता पकडला, कामांची आखणी व कष्ट केले की यश फार लांब राहात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील अमोल जाधव या तरुणानं ५० शेळ्यांपासून पूरक व्यवसाय सुरू केला. तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थापन करीत २०० पर्यंत त्यांची संख्या वाढवली. आॅनलाइन पद्धतीने मार्केटिंग करीत शंभरपर्यंत शेळ्यांची विक्री केली. दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या जिल्ह्यात चिकाटीने या व्यवसायाला पोल्ट्रीची जोड देत अमोल यांनी आपल्या प्रयोगशीलतेचा नमुना पेश केला आहे..
सुदर्शन सुतार

बार्शी-कळंब रस्त्यावर हासेगावपासून चार किलोमीटरवर आत हावरगाव हे उस्मानाबाद जिल्ह्यातील छोटंसं गाव. तेथील अमोल हा युवक जेमतेम दहावी शिकलेला. आई-वडील, दोन बहिणी असं कुटुंब. वडिलोपार्जित सात एकर शेती, पण पाण्याचा सतत दुष्काळ. विहीर, तीही हंगामी. वडील पारंपरिक शेतकरी. उत्पन्न आणि उत्पादनाचा मेळ कधीच बसला नाही.
ड्रायव्हर ते शेळीपालक अमोल

शेतीची प्रतिकूल स्थिती पाहून कुटुंबाला आर्थिक हातभार लावणे व दोन बहिणींच्या लग्नाची जबाबदारी यातून दहावीनंतरच अमोल पुण्यात खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरीला लागला. बहिणींची लग्ने कशीबशी उरकली. दोन-तीन वर्षे अशीच काढली. पण पुण्यात मिळणारा पगार आणि खर्च यांचा मेळ काही बसेना. अखेर गावच्या शेतीतच काहीतरी करावं असं त्यानं ठरवलं. काय करावं हा प्रश्‍न होताच. पण शोधणाऱ्याला सगळं सापडतं म्हणतात, तसंच अमोलबाबत झालं.

भाच्याच्या मदतीला आला मामा
केज तालुक्‍यातील युसूफ वडगाव या आपल्या गावी अमोलचे मामा महादेव निकम पोल्ट्री व्यवसाय करतात. साहजिकच अमोल यांनीही मामांना मदत करताना पोल्ट्री व्यवसायात लक्ष घालायला सुरवात केली. मामांनीच मग शेळीपालनाचा मार्ग दाखवला.

पाच लाख गुंतवले
शेळीपालन व्यवसाय अमोलच्या डोक्‍यात चांगलाच घुसला. त्याचा सुरू झाला त्यातील प्रवास.
-व्यवसाय सुरू करण्यापूर्वी ६ महिने त्याचा अभ्यास
-पाच दिवसांचे प्रशिक्षण- पुणे येथे
-राज्यातील काही महत्त्वाचे शेळीपालन प्रकल्प अभ्यासले

शेळीपालनास सुरवात
-अद्ययावत बंदिस्त शेळीपालन शेड- १०० बाय ३२ फुटांचे. ठिकाण - हावरगावच्या शेतात.
-सुरवातीला मित्राच्या मदतीने ५० पिलांची खरेदी.
-गेल्या दीड ते पावणेदोन वर्षार्त शेळ्यांची संख्या पोचली- २०० पर्यंत.

मार्केटिंग, विक्री (मुख्यतः पैदासीसाठीच)
-आत्तापर्यंत २०० शेळ्यांची (नर-मादी मिळून) विक्री.
-दर (किलोचे)
शेळी- २५० रुपये (शेळीचे वजन- ४० किलो)
बोकड- २७५ रुपये (बोकडाचे वजन- ५० किलो)

आॅनलाइन विक्री
अमोल यांनी saigoatfarm.com ही वेबसाईट सुरू केली.
त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला.

नव्या पिढीकडे ॲंड्रॉईड मोबाईल व नेट कनेक्शन असल्याने आॅनलाइन पद्धतीच्या विक्रीची त्यांना सर्व माहिती आहे. त्याच आधारे विक्री करणे मला सुलभ झाले.
अमोल जाधव

अमोल म्हणाले
-उस्मानाबादी शेळीचे जातिवंत वाण पैदास करण्यावर भर देणार आहे. मुख्यतः ‘ब्रिडिंग’साठी शेळी पुरवण्याचा मनोदय आहे. त्यादृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे.
-बाजारात अनेक व्यापारी नगाप्रमाणे शेळी खरेदी करतात. मात्र त्या पद्धतीने आपल्याला शेळीची पुरेपूर किंमत मिळतेच असे नाही. म्हणून वजनावर विक्री हाच मार्ग फायद्याचा. त्यातून शेतकरी व ग्राहक दोघेही संतुष्ट होतात. मी त्यादृष्टीने इलेक्ट्रॉनिक वजन काट्याची व्यवस्थाही केली आहे. .

मी उस्मानाबादी शेळीच का निवडली?
-ती कोणत्याही हवामानात राहू शकते.
-अतिशय काटक आहे.
-वर्षातून दोनदा वेत देते, प्रत्येकवेळी दोन पिले देते. एक शेळी तर चार पिले देणारी आहे.
-मटण चविष्ट असल्यान मागणीही चांगली.

छायाचित्रे
शेडची रचना
-चोहोबाजूंनी जाळी आणि वरती पत्रा.
-शेडचे चार स्वतंत्र भाग
-प्रत्येक भागात चारा आणि पाण्यासाठी स्वतंत्र गव्हाण, त्याद्वारे शेळ्यांना हवा तेव्हा खाद्य आणि पाणी घेता येते. बंदिस्त शेळीपालन असल्याने पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था जागेवरच योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने.
-चारही भागांत फिरण्यासाठी पुरेशी मोकळी जागा

-चारा
हिरवा-
अर्धा एकर
मेथी, तीन वर्षे कटिंग घेण्याजोगी
चारा पीक
-शेळ्यांच्या आवडीचे खाद्य असणाऱ्या शेवरीची बांधावर लागवड

वाळलेला
पावसाळ्यात जास्त उपलब्ध झालेल्या
चाऱ्याचे मूरघासमध्ये रूपांतर
(सायलो)(सुमारे २००० कडबा पेंढीची साठवण)
-
गरजेनुसार बाहेरून खाद्य आणले जाते. मात्र खर्च वाढविण्यापेक्षा शेतातच अधिकाधिक चारानिर्मितीचा प्रयत्न.

पाणी
-सहा बोअर, मात्र एकच चालते
-विहीर
-शेताला
-शेडमध्ये


शेतीवरही लक्ष
शेळीपालनातून मिळू लागलेल्या उत्पन्नामुळे अमोलचा शेतीतील उत्साहदेखील वाढला आहे. यंदा प्रत्येकी एक एकर ज्वारी व गहू, अर्धा एकर कांदा अशी पिके घेतली.

शेळ्यांवर घर चालतं का?
सुरवातीला वडिलांनी विरोध करीत शेळ्यांवर कुठं घर चालतं का? त्यातून आपलं कसं होणार अशी शंका व्यक्त केली. पण शांत वृत्तीच्या अमोल यांनी त्यांना धीर व विश्वासही दिला. कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचं नाही हे निश्‍चित केलं. अमोल यांच्या पत्नी सौ. ज्योती यांनीही चांगली साथ दिली. सरकारी पशुवैद्यक डॉ. नवनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन मिळते. जोडीला अमोल मामांच्या गावी (सुमारे १५ किमी.) ३००० देशी पक्ष्यांचा पोल्ट्री व्यवसायही सांभाळतात. तेथे दर महिन्याला प्रति १००० पक्ष्यांची प्रति तीन महिन्यांची बॅच घेतली जाते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला पक्षी उपलब्ध होतात. किलोला सुमारे १५० रुपये दराने त्यांची विक्री होते.

- संपर्क - अमोल जाधव - ९६५७००३०००.

No comments:

Post a Comment