आयपीएल महत्वाचे आहे कि लोकांना पिण्याचे पाणी ?? भाजप चा मुखवटा नेमका कोणता आहे??
एकतर महाराष्ट्रात १९७२ पेक्षा भयानक दुष्काळ पडला असताना ४० लाख लिटर पाण्याची फुकट उधळपट्टी होणार आहे. इकडे मराठवाडा आणि विदर्भातील , पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे दुष्काळामुळे होरपळून निघत आहेत मात्र चंगळवादी लोक जे भारतात राहत नाहीत तर इंडिया मध्ये राहतात त्यांना याचे काहीच सोयर सुतक नसावे यापेक्षा काय वाईट ते. दिवाळी मध्ये जर एखाद्याच्या शेजारील घरात जर मयत झाले असेल आणि आपण त्याचे घरात झाले आहे माझ्या नाही म्हणून खुशाल फटाके वाजवणार असो तर आपल्या संवेदना बोथट झाल्या आहेत असेच म्हणावे लागेल. त्यांचे दुखात जर सामील होता आले नाही तर किमान त्यांचे जखमांवर मिट तरी चोळू नये. जर एवढाच पैशाचा माज असेल तर विकत आणावे पाणी ३ रुपया लिटर ने दुसऱ्या राज्यातून किंवा इतर ठिकाणी मिळेल तिथून.
जर या वेळचे सामने जर दुसऱ्या राज्यात भरवले तर खूपच चांगले होईल ज्या राज्यात पाण्याची चांगली व्यवस्था आहे. मात्र अश्या ठिकाणी कॉंग्रेस चे शुक्ला आणि भाजपच्या मंडळी सगळा विरोध विसरून बरे एक होतात. या राज्यात दुष्काळ आणि नापिकी मुळे अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत तर अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत त्यांना मदतीसाठी पुढे येणारे किती जन आहेत. आमचे मुख्यमंत्री तर " भारत माता कि जय" म्हणण्यात दंग आहेत मात्र या भारत भूमीच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागतेय तिकडे लक्ष्य द्यायचे आणि त्यांची तहान कशी भागेल यावर लक्ष्य देण्या ऐवजी सगळ्यांचे लक्ष भलतीकडेच वळवत आहेत यासारखे वाईट ते काय. कॉंग्रेस ला तर लाज नव्हती ती आता भाजप कडे आहे कि नाही असा प्रश्न इथल्या जनतेला पडत आहे.
या सरकार ने नको ते थेर काढण्यापेक्षा लोकांचे प्रश्न आणि समस्या कश्या मिटवता येतील याकडे विशेष लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा आगामी काळात शिवसेना अधिक आक्रमक होऊन भाजप विरोधात रान उठवेल कारण लोकशाही ने ज्यांना विरोधक केले आहे त्यांना विरोधात राहण्याची आणि विरोधकाची भूमिका माहीतच नाही कि काय असा प्रश्न पडतो नव्हे महारष्ट्रात विरोधक आहेत कि नाही असा प्रश्न पडतो. कारण विरोधकांची पोकळी निर्माण झाली आहे आणि विरोधक कुठेही दिसत नाहीत. एक महान नेते तर अजून क्रिकेट सोडायला तयार नाहीत हेच काल बारामती मधील कार्यक्रम यावरून दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेना आता अधिक अक्रमहोऊन तीपोकळी भरून काढेल आणि उद्याची समीकरणे यामध्ये बदल होऊन मित्र पक्षाचे मदतीने किंवा इतर छोट्या पक्षाच्या मदतीने पुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल यासाठी प्रयत्न निश्चित करणार. तसेच आगामी काळात जर शिवसेना स्वबळावर मुंबई महापालिकेत सत्तेवर आली तर राज्यात विधानसभा निवडणुका लागू शकतात कारण शिवसेना पाठिंबा काढू शकते.
त्यामुळे भाजप ने नको त्या किंवा भलत्या मुद्द्यावर लक्ष ने देता शेतकऱ्यांचे आणि पिण्याचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊन उगीच भाष्कळ विधाने करू नयेत. कारण त्यांचे खरे देश प्रेम आता उघड झाले आहे. जेएनयु मध्ये त्यांनी देश विरोधी घोषणा दिल्याचाआरोप ठेऊन कन्हैया कुमार ला तात्काळ अटक केली होती. जो व्हीडीवो मिळाला तो खरा कि खोटा याची पडताळणी न करताच त्याला अटक केली मात्र तिकडे काश्मीर मध्ये "भारत माता कि जय " अश्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लाठीमार करण्यात आला. तिकडे भाजप आणि पीडीपी यांचे सरकार आहे त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी देशाच्या आणि प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि भाजप च्या आवडीच्या घोषणा दिल्या तर लाठीमार हि कोणती दुटप्पी भूमिका आणि हा कोणता विभाजित राष्ट्रवाद ?? का फक्त सोयीचा आणि राजकीय फायद्याचा राष्ट्रवाद हाच अजेंडा असेल तर येणारा काळ खडतर असणार आहे कारण सत्य जास्त दिवस लपून राहत नाही . आरएसएसचा अजेंडा जर भाजप ला राबवायचा असेल तर या देशात ते होऊ दिले जाणार नाही असेच काहीसे वातावरण तयार झाले आहे. पाहूयात पुढचा अंक कसा राहतो ते.....
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१