Tuesday, 15 March 2016

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा...

आज १६ मार्च रोजी श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्याबद्दल सर्व देशवाशियाना खूप खूप शुभेच्छा.

अनेकांना आपला हा महापराक्रमी योध्दा अद्याप माहित नाही कारण इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात ते आपल्याला सापडत नाही. पण कितीही काही झाले तरी आता त्यांचा इतिहास समोर येत आहे आणि त्यांचे ते महापराक्रमी व्यक्तिमत्व माहित होत आहे. या ठिकाणी म्हणून आज त्यांचे कार्याचा थोडासा परिचय द्यावासा वाटतो तसेच त्यांचे महापराक्रम आणि गाजवलेल्या शौर्याला सलाम करावासा वाटतो.

आपल्या देशाचा इतिहास जर पाहिला तर अनेक राजांनी आपल्या देशावर आक्रमण केली तसेच या देशाला लुटले. या देशात सोन्याचे प्रचंड साठे आणि मुबलक साधन संपती असल्याने अनेक राजे जसे कि सिकंदर, अब्दाली इत्यादीसह अनेकांनी देशावर लुटीसाठी आक्रमणे केली. मात्र आपल्या देशातील कोणत्याही राजाने आपल्या देशातील राज्यांना लुटण्याव्यतिरिक्त बाहेर कोणत्याही देशावर आक्रमण किंवा लुट केली नाही.

श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी मात्र मध्य आशियातील अफगाणिस्थान जिकडे गीलचे आणि पठाण (अब्दाली त्या भागातील होता) यांचे प्रदेशात आक्रमण करून लुट केली होती. यामध्ये आज महाराष्ट्रात एक म्हण प्रचलित आहे " अटकेपार झेंडे रोवणे" ती आहे कोणतेही यश मिळवले कि त्याची तुलना अटकेपार झेंडे रोवले म्हणून केली जाते. अटकेपार झेंडे रोवले ते महापराक्रमी योद्धा श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनीच. या मोहिमेत त्यांचेबरोबर होते तुकोजीराजे होळकर (प्रथम) अटक या शहरात घुसून प्रचंड लुट आणि आक्रमण तसेच शौर्य गाजवले ते यांनीच. हे आक्रमण एवढे रौद्र आणि भयानक होते कि नंतर तिकडे कोणी "मल्हार आया है" असे म्हणाले तरी लोक गावेच्या गावे सोडून जात व भीतीची प्रचंड दहशत निर्माण झाली होती आणि शत्रूला सुद्धा जाम केले होते.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची मुहुर्थ मेढ रोवली या महाराष्ट्रात. त्याच महाराष्ट्राच्या कर्तुत्ववान भूमीत फलटण तालुक्यातील होळ मुरूम येथे साध्या मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेल्या आणि ज्यांचे वडील यांचे वय ३ वर्षाचे असताना सोडून गेले होते. या श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी महान पराक्रम आणि तलवार गाजवून मराठेशाही ची पताका खांद्यावर घेऊन आणि खंडोबाची आराधना करून मराठी साम्र्ज्याची इमारत आणि कळस निर्माण करण्याचे महान कार्य केले तसेच उत्तरेसह संपूर्ण भारतभर मराठी साम्राज्य घेऊन गेले. वयाच्या १५ व्या वर्षापासून हातात तलवार घेऊन लढणारे श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वयाच्या ७१ वर्षापर्यंत म्हणजे पूर्ण हयात रणांगणावर घालवली होती. या हजारो लढाया आणि अगणित युद्ध तेही सपाट प्रदेशात " गनिमी काव्याने" लढणारे महान योद्धे होते. गनिमी कावा हा खरे तर सम्राट चंद्र गुप्त मौर्य यांनी शोधला आणि पुढे त्याचा वापर छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत थोरले राजे मल्हारराव होळकर यांनी वापर करून आपले युद्ध कौशल्य धाखावले आणि अनेक योद्धे जिंकली.

आज अश्या या महापराक्रमी राज्याला ज्याची इतिहासाने दखल घेतली नाही त्यांचे शौर्यास आणि कार्यास सलाम तसेच सर्व देश बांधवाना त्यांचे जयंती निमित्य कोटी कोटी शुभेच्छा...आज ज्यांनी इतिहास घडवला त्यांनी जर इतिहास लिहिला असता तर खरा इतिहास आमच्यापुढे आला असता आणि त्याचेपासून प्रेरणा घेऊन नव्या पिढ्या इतिहास घडवायला तयार झाल्या असत्या.........

जय मल्हार.... जय भारत....

विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Thursday, 10 March 2016

सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे राईट टू पी या चळवळीस सलाम

सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांचे राईट टू पी या चळवळीस सलाम

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख या महिलांचे विशेष हक्क आणि अधिकार यासाठी काम करत आहेत. त्यांची विशेष चळवळ जिचे नाव आहे "राईट टू पी" म्हणजे सार्वजनिक अधिकार. त्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी युरीनल सेवा मोफत आणि त्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असावे यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून त्या महिलांचे अधिकार यावर काम करत असताना महिलांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे सार्वजनिक युरिनल जे आज पैसे घेऊन चालवले जातात तसेच त्या ठिकाणी सुरक्षा, स्वच्छता याबाबी नसतात. तसेच अनेक ठिकाणी तर महिलांना सार्वजनिक किंवा कोणत्याही ठिकाणी युरिनल नसतात. त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते किंवा त्यांचेवर उघड्यावर जाण्याची वेळ येते इथे त्यांचेवर अतिप्रसंग होण्याचे पण शक्यता असते किंवा धोका असतो किंवा तश्या घटना घडल्या आहेत.

मुमताज शेख यांचे विशेष अभिनंदन कारण त्यांनी सुरु केलेली "राईट टू पी" चळवळ याची दखल घेतली गेली ती बीबीसी वर्ल्ड ने. जगातील १०० प्रतिभाशाली महिलांमध्ये मुमताज शेख यांची गणना होते हि महाराष्ट्र तसेच देशासाठी खरच अभिमानाची गोष्ठ आहे. यांचे कार्य जर पाहिले तर यांचे पुढाकारातून मुंबई येथे एका वर्षात ९६ मोफत महिला युरीनल सेवा सुरु झाली आहे. आज मितीला मुंबई मध्ये महिला युरीनल जवळ जवळ ३००० झाली असून त्यामध्ये मुमताज शेख यांचे मुळे खरे तर भर पडली आहे.

बीबीसी वर्ल्ड ने ने त्यांचे कार्याची दखल घेतली आणि त्यांचा गौरव सुद्धा केला तसेच त्यांची निवड हि जगातील ज्या १०० प्रतिभाशाली महिला निवड करण्यात आली त्यामध्ये त्यांची निवड या सामाजिक कार्यातून झाली. म्हणजे तुम्ही समाजातील कोणतीही समस्या घेऊन त्यावर कार्य करा आणि त्याला तडीस घेऊन जाल तर तुमच्या कार्याची नक्कीच दखल घेतली जाईल याची प्रचीती यानिमित्ताने आली आहे.

मित्रानो माणसाचा धर्म कोणता आहे इकडे आपण नेहमीच आपल्या चष्म्यातून पहात आसतो मात्र मानवतेला आणि सामाजिक कार्याला मात्र कोणता धर्म असतो का ? तिथे तर धर्माच्या कोणत्याही भिंती आडव्या येत नाही हेच मुमताज यांचे या कार्यातून समोर येते. महारष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी महिला समस्या कडे पूर्णपणे लक्ष्य दिले पाहिजे तसेच ते सोडवण्यासाठी निधी तरतूद करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा.

पुन्हा एकदा मुमताज शेख यांचे कार्यास तसेच त्यांचे "राईट टू पी" या चळवळीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तसेच जाहीर पाठिंबा.

विजय गोफणे, पुणे


९४०४०८०००१

Monday, 7 March 2016

स्त्रियांना माणूस म्हणून समान वागणूक या पुरुषप्रधान संस्कृतीत कधी मिळणार ...

महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा ...

स्त्रियांना माणूस म्हणून समान वागणूक या पुरुषप्रधान संस्कृतीत कधी मिळणार ???

आज जागतिक महिला दिन आहे. या दिवसाचे एकवेगळेपण नक्कीच आहे.
आजचा हा दिवस आहे स्त्रीत्वाच्या उत्सवाचा नि स्त्रीत्वाच्या सर्जनशील अस्तित्वाचा. मानवाने कोरून काढलेल्या विश्वात स्वत:च्या रक्‍ताचे शिंपण करून मानवी मूल्यांची पेरणी करणाऱ्या बाईच्या जातीचा. तिच्याप्रती असलेल्या काहीशा कृतज्ञतेच्या जाणिवेचा; बराचसा अपराधी भावनेचाही! शतकानुशतके दुय्यम मानव म्हणून वागणूक सहन करत आलेल्या स्त्रियांनी हे दुय्यमत्व आता झुगारून दिले आहे. आज त्यांनी अनेक क्षेत्रे आपल्या कर्तुत्वाने पादाक्रांत केलेली आहेत त्या कर्तुत्वाला खरे तर सलाम केला पाहिजे.

आपण आंनी आपली संस्कृती स्त्रियांना सदोदित देवत्व किंवा मातृत्व बहाल करण्याच्या फसव्या बहाण्यानेच स्त्रीत्वाच्या रोकड जाणिवांना पद्धतशीर नख लावण्याचा काम करत आले आहे. "स्त्री ही क्षणकालाची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते‘ हे टाळीचे वाक्‍य विशिष्ट संदर्भात सुविचारासारखे ठरते. परंतु, व्यवहारात मात्र त्याला कुठल्या तागडीत तोलायचे, हा प्रश्‍न कुठल्याही सुजाण नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही.

स्त्री "ही अनंतकाळाची माणूस असते‘ हे त्यातच दडलेले रोकडे सत्य आपल्याला आणखी किती पिढ्या खर्ची पडल्यानंतर ऐकू येऊ लागणार आहे, हे कोडेच आहे. आपण "महिला दिना‘च्या सोहळ्यात दिवस मावळेपर्यंत अगदी उत्साहाने सामील होऊ तसेच जोरदार भाषणे सुद्धा करू आणि महिला सबलीकरण यावर आपले मतही प्रभावीपणे मांडू, यात दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता, काहीही शंका नाही. पण प्रश्न आहे तो इतर 364 दिवसांत आपण कसे वागणार, हाच...

सर्वांना विनंती आहे कि वर्षातील प्रत्येक दिवस हा महिला सन्मान दिवस आहे असे मानून आपल्या माता, भगिनी , पत्नी तसेच समाजातील इतर स्त्रिया यांना केवळ स्त्री म्हणून न पाहता एक माणूस म्हणून पहा आणि त्यांना समानतेने आणि सन्मानाने वागवा याच शुभेच्छा आणि सदभावना राहील महिलांप्रती..

जय भारत
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१

Friday, 4 March 2016

चला १ एप्रिल साजरा करूयात "फुल्ल भोजन दिवस " ...

चला १ एप्रिल साजरा करूयात "फुल्ल भोजन दिवस " ...
मित्रानो आपल्याकडे १ एप्रिल म्हणजे एकमेकाला फसवण्याचा दिवस (एप्रिल फुल) म्हणून साजरा केला जातो किंवा तसे मानले जाते. तसे पाहिले तर वर्षातील ३६५ दिवस हा फसवणुकीचा कार्यक्रम आणि दिवस चालूच असतो त्यासाठी कोणालाही मुहुर्थ किंवा याच तारखेला फसवले पाहिजे असे काही नसतेच. तरीही आपल्याकडे सगळे साजरा करतात म्हणून १ एप्रिल रोजी कोणीही कोणालाही खासकरून जो परिचयाचा असतो त्याला फुल करत असतो.
असो मुद्दा हा आहे कि आम्ही ठरवले आहे कि १ एप्रिल हा " एप्रिल फुल " असा दिवस न करता जे अनाथ किंवा गरीब आहेत ज्यांना १ वेळेची जेवायची भ्रांत पडली आहे त्यांना एक वेळचे " फुल्ल " जेवण द्यायचे जे आपण आपल्या घरी जेवतो. म्हणून या दिवसाला मित्रानो आम्ही " फुल्ल भोजन दिवस " असा दिवस म्हणून साजरा करायचा ठरवले आहे.
यामध्ये नेमके असे करायचे आहे कि त्या दिवशी आपल्या घरातील एकवेळचे जे जेवण तयार करू त्यामध्ये १ व्यक्तीचे जास्तीचे जेवण तयार करायचे. ते जेवण आपल्या भागातील जे अनाथ असतील, ज्यांना जेवणं मिळत नाही असे गरीब असतील, जे शासकीय दवाखान्यात दाखल झालेत पण १ वेळचे महागडे जेवण घ्यायला पैसे नाहीत त्यांना जेवण देणे किंवा जे कोणी गरजू असतील अश्या आपल्या देश बांधवाना त्या दिवशी जेवण द्यायचे कार्य आपण करूयात.
मित्रानो १ एप्रिल या दिवशी आपण कोणालाही फसवणार किंवा फुल करणार नाही तर एक सामाजिक जबादारी म्हणून एक दिवस किमान एक वेळचे गरजूंना जेवण देऊन सामाजिक उत्तरदायित्व दिवस म्हणून साजरा करू शकतो.
ज्यांना या दिवशी गरजूंना जेवण द्यायची इच्छा असेल , किंवा या उपक्रमात तसेच आमच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी कृपया खालील नाव आणि नंबर यावर संपर्क साधावा तसेच हि संकल्पना आवडली तर watsaap, twitter, facebook, तसेच इतर मेडिया पर्यंत हा मेसेज पोहचवाल आणि हि चळवळ मोठ्या प्रमाणात राबवण्यास सहकार्य कराल हीच अपेक्षा आणि आपणास विनंती कि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवा.
( सर्व ग्रुपपर्यंत हि माहिती पोहचवा आणि सहभागी व्हा
यासाठी ‪#‎१एप्रिलभोजनदिवस‬-विजय गोफणे९४०४०८०००१ हि लिंक शेयर करा,
तसेच आपल्या भागात सुद्धा साजरा करा दिवस)
जय भारत
विजय गोफणे, पुणे
९४०४०८०००१ (संपर्क

Thursday, 3 March 2016

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच

कोणत्याही टोकाच्या विचारसरणी देशाला घातकच ......

देशामध्ये अनेक विचारसरणी आहेत आजमितीला. अतिशय चांगली गोष्ठ आहे हि कि विचार करण्याची किंवा बुद्धीचा वापर ( विचारसरणीला बुद्धीची गरज असते) करण्याची मुभा आहे. मुळात ज्या अनेक विचारसरणी ज्यांचे नावाने असतील जसे कि मार्क्स , लेनिन, फुलेवाद, आंबेडकरवाद, पेरीयारवाद, संघवाद , डाव्या , उजव्या इत्यादी अनेक विचारसरणी आहेत. मात्र कोणतीही विचारसरणी हि शाश्वत नसत तर कालानुरूप तिच्यामध्ये काही बदल होतात किंवा त्यामध्ये आणखी माहिती सामाविस्ट करावी लागते.

जिच्या मध्ये असे बदल घडत नाहीत किंवा बदलास सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत त्या विचारसरणी पाठीमागे पडतात. त्यामुळे फक्त तेच विचार किंवा तत्वज्ञान अगदी बरोबर आहे आणि नवीन चुकीचे आहे म्हणून टोकदार वागणे किंवा त्या विचारसरणीचा टोकाचा प्रचार आणि प्रसार करणे हे देशासाठी नक्कीच घातक आहे. आपल्या देशात नेमके तेच घडत आहे असे वाटते कारण प्रत्येक जन नाव त्या विचारसरणी असलेल्या नेत्याचे घेतो आहे आणि अगदी टोकाची रेटा रेटी चालू आहे. यामध्ये संघ आघाडीवर होता आता त्याचे जोडीला डाव्या संघटना आणि इतर विचारसरणी टोकाचे विचार आणि प्रतिक्रिया देताना दिसतात. देशातील वातावरण यामुळे बदलत असून अनेक संघटना आणि संस्था या सध्याच्या सरकार विरोधात दंड थोपटून उभ्या आहेत. या साठी सरकार सुद्धा तेवढेच जबाबदार आहे.

कारण नसताना अनेक ठिकाणी सरकार हस्तक्षेप करत आहे जसे कि जेएनयु असेल , किंवा एफटीआई, हैद्राबाद इत्यादी ठिकाणी जास्तच हस्तक्षेप आणि तानातानी झालेली आहे. त्यामुळे मृत अवस्थेत चाललेले विरोधी पक्ष, संघटना तसेच देशाला घातक असणाऱ्या शक्ती यांना पोषक आणि पूरक वातावरण आयतेच सरकार ने निर्माण करून दिले आहे. मुळात अनेक देशात क्रांती झाल्या त्या क्रांतीचे शिलेदार किंवा विचारप्रणालीचे निर्माते यांनी त्याकाळात आवश्यक त्या विचारसरणी तयार केल्या. मात्र आमचे बरेच लोक त्यांचे चळवळी, आंदोलने किंवा तत्वज्ञान पाहून आले आणि आपल्या देशात जसेच्या तसे वापरू पहात आहेत. मुळात आपल्या देशात सुद्धा चांगले विचारवंत किंवा तत्वज्ञान तसेच चळवळ साठी पूरक विचार निर्माण करून गेलेले महापुरुष आहेत पण आमची मानसिक गुलामी काही केल्या संपत नाही हे यावरून दिसून येते. आमचेकडे सुद्धा अनेक विचारवंत आणि तत्वज्ञ होऊन गेले यांचे विचार किंवा तत्वज्ञान यावर काम करणाऱ्या संघटना का नाहीत.

देशात होऊन गेलेले अनेक संत , तत्वज्ञ जसे कि फुले , पेरियार, आंबेडकर, शाहू सह अनेकांनी अतिशय चांगले , उपयुक्त आणि देशी तत्वज्ञान दिलेले असताना तसेच या संत आणि तत्वज्ञानी लोकांना इथल्या समाजाने बहिष्कृत, किंवा छळ, किंवा कपटाने मारले असताना आणि चांगले तत्वज्ञान दिलेले असताना आम्हाला ते का नको आहे आणि परदेशी का हवे आहे आणि तेही टोकाचे का हवे आहे तेच कळायला मार्ग नाही. काही कालखंड असतो ज्या काळात काही विचारसरणीला पोषक वातावरण निर्माण होते कारण त्याला सहाय्यभूत सरकार येते त्यावेळी ती विचारसरणी वाढते किंवा त्या विचारसरणीला मानणारे सरकार अतिरेक करू लागले तर त्या विचारसरणी विरोधात उठाव होऊ लागतो ज्यामुळे सरकार आणि त्या विचारसरणीला ब्रेक लागतो.

त्यामुळे अनेक विचारसरणी असल्या पाहिजेत पण टोकाच्या जरूर नसाव्यात.
ज्यामुळे देश्याबाहेरून देशाच्या विरोधात काम करणाऱ्या तसेच देश विघटन करू इच्छिणार्या शक्तींना बळ येऊन त्या त्यांचे इच्छित कार्य देशात करू शकतील. त्यामुळे वैचारिक वाद आणि संवाद देशात चालू राहतील पण ते टोकाचे नसावेत जेणेकरून बाह्य शक्ती याचा फायदा घेऊन देशात अस्थिर वातावरण किंवा देशाचे नुकसान करतील.

देशाला आता गरज आहे एका नव्या विचारसरणी , तत्वज्ञान यांची ज्यामुळे देश हा सर्वांना आपला वाटेल आणि ज्यामध्ये सर्वांचा विकास, सर्वांचे भले आणि कल्याण , समता , ज्ञाय, बंधुता , राष्ट्रप्रेम इत्यादी मुल्यांचा अंगीकार केला पाहिजे.

( गरज आहे भारतीयवाद किंवा बहुजन नव्हे तर भारतजन म्हणायचे वेळ आली
आहे असे वाटते)


जय भारत

Monday, 22 February 2016

दुष्काळामुळे सामाजिक जीवन उद्वस्त होत चालले आहे याकडे कोण लक्ष देणार का ??

बीड मध्ये २५ युवती यांनी घेतला लग्न न करण्याचा निर्णय :

दुष्काळामुळे सामाजिक जीवनच उध्वस्त होत चालले असल्याचे बीड मध्ये दिसून आले आहे. पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आणि उग्र झाला आहे. याच जिल्ह्यात ३०१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत जे कि नक्कीच भूषण नाही. जिल्ह्यातील पाचोळा आणि माजलगाव भागातील अनेक तांड्यावर भीषण पाणीटंचाई आहे त्यामुळे मेंढपाळ, पशुपालक यांचे अतोनात हाल होताना दिसत आहेत.

हि सगळी भयावह परिस्थिती पाहून तसेच अनेक मुलींच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्या आहेत तसेच कर्जाला कंटाळून जीवन संपवले आहे. अश्या भीषण परिस्थिती मध्ये पाचोळा आणि माजलगाव भागातील २५ युवती लग्न करणार नाहीत अशी त्यांनी घोषणा केल्याचे वाचनात आले. तसेच त्यांनी हा निर्णय आपल्या पालकांना सुधा कळवला आहे.

दुष्काळाची धग किती भयानक आहे आणि सामाजिक जीवनात गरीब, शेतकरी, कष्टकरी, मेंढपाळ, कामगार यांना याचे किती चटके बसत असतील हे संवेदनशील लोक नक्की समजून घेतील का?? सहकार्य आणि मदत करून त्यांना या भीषण दुष्काळ आणि दारिद्र्यातून सरकार तसेच इथले राज्यकर्ते बाहेर काढतील का??

चला आपण सगळे जन सामाजिक जाणीवेतून हा प्रश्न सरकार पर्यंत पोहचवू तसेच हुंडा बंदी, सामुदायिक विवाह सोहळे, दुष्काळी भागातील शिक्षण मोफत कसे करता येईल याचे पर्याय सुचवू आणि सरकार नावाची निर्जीव वास्तूला हलवून जागे करूयात.....

सरकार नेच पुढाकार घेऊन कन्यादान करावे ( सामुदायिक विवाह सोहळे तालुका, जिल्हा पातळीवर आयोजित करून गरिबांचे कल्याण करावे) तसेच सामाजिक जीवन सुरळीत करण्यासाठी निकराने प्रयत्न करावेत.तसेच राज्यातील सर्व पक्षांचे नेते, पुढारी हे सुधा असे मेळावे आणि उपक्रम घेतील का जेणेकरून लोकांना जगणे शक्य होईल????

आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहचवाल ....

Thursday, 18 February 2016

शेतमाल खरेदीचे २६० कोटीचे करार संपन्न

राज्यस्तरीय शेतमाल खरेदीदार आणि विक्रेता संमेलनास जोरदार प्रतिसाद :

काल आम्ही राज्यस्तरीय खरेदीदार आणि विक्रेता संमेलन शिवाजी स्टेडीयम , बालेवाडी येथे आयोजित केले होते ज्याला उदंड प्रतिसाद लाभला.
आता खरेदीदार म्हणजे या देशात असणाऱ्या मोठ्या कंपन्या, निर्यातदार, प्रक्रियादार जे मोठ्या प्रमाणात शेतमाल खरेदी करतात आणि विक्रेता म्हणजे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आम्ही सर्व महाराष्ट्रात तयार केल्या आहेत. आम्ही महाराष्ट्रात ४५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण केल्या आहेत ज्या फळे, भाजीपाला, धान्य, कढधान्य, तेलबिया इत्यादी प्रकारातील शेतमाल पिकवत आहेत. एक कंपनी मध्ये ३०० ते ४०० शेतकरी ४ते५ गावातील आणि १५ ते २० गट मिळून एकत्र आलेले असतात. या कंपन्याणा आम्ही १८ लाख रुपयाचे प्राथमिक प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मशिनरी , शेड इत्यादी साहित्य दिले आहे.
खरेदीदार कंपनी या मध्ये मोठ्या ७५ मोठ्या कंपन्या , निर्यातदार , प्रक्रियादार इत्यादी सहभागी झाले होते . मित्रानो शेतकर्यांना जेंव्हा उद्योजक , व्यावसायिक तयार करत असताना अशे मोठे खरेदीदार जे आता शेतकऱ्यांकडून थेट शेतमाल खरेदी करणार आहेत.
काल झालेल्या इन्वेस्टर मिट ( खरेदीदार-विक्रेता संमेलन) या मध्ये शेतकरी आणि उत्पादक कंपन्या यांचेमध्ये २७६ करार झाले. या २७६ करारामुळे २६० कोटी रुपये चा व्यवसाय शेतकरी आणि या कंपन्या मध्ये होणार आहे. मेक इन इंडिया मध्ये जसा गुंतवणुकीचा धडाका चालू आहे तसा आम्ही इकडे बार उडवून देऊन आपल्या शेतकर्यांना आता आपला शेतमाल प्राथमिक प्रक्रिया करून विकता येणार आहे तसेच त्यांचा नफा देखील वाढणार आहे.
कालचा दिवस कृषि क्षेत्राला एक कलाटणी आणि २६० कोटी गुंतवणूक (थेट) येणार असल्याने तसेच आम्ही केलेल्या मेहनतीला फळ मिळाल्याचे खूप समाधान वाटले. आमच्या सर्व टीम चे खूप खूप आभार तसेच शेतकरी बांधवांना तसेच कृषि क्षेत्रात गुंतवणूक, व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वाना शुभेच्छा तसेच ज्यांना व्यवसाय प्रस्ताव तयार करून घ्यायचे आहेत त्यांना आम्ही मोफत प्रस्ताव तयार करून देणार आहोत तसेच शेतीमध्ये, शेतमाल प्रक्रिया यामध्ये भविष्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि शेतकरी कल्याण यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत...
जय किसान .....जय भारत ....